शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: ३० सप्टेंबरपर्यंत मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेणार, सरकारने लेखी दिले: मनोज जरांगे पाटील
2
"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
3
मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! अंतिम मसुदा घेऊन सरकारचे ४ मंत्री मनोज जरांगेंच्या भेटीला
4
८ वर्षांपूर्वी गायब झालेला 'रीलस्टार' पती, सतत शोध घेत होती पत्नी! आता समोर आलं धक्कादायक सत्य
5
शेअर बाजारापेक्षा जास्त परतावा देणारी सरकारी योजना; EPF का ठरत आहे सरस? संपूर्ण गणित समजून घ्या
6
Video: आझाद मैदान परिसरात तणावाची स्थिती, आंदोलकांनी वाट अडवली; पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली
7
Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीला का बांधला जातो अनंताचा धागा? हे व्रत गणेशाचे नाही तर... 
8
भाक्रा धरणापासून एअरबेसपर्यंत पाकिस्तानला दिली माहिती; प्रसिद्ध युटयूबर विरोधात आरोपपत्र दाखल
9
"पूर नव्हे, हा तर देवाचा आशीर्वाद"; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी जनतेला दिला अजब सल्ला! म्हणाले...
10
'आंदोलक रस्त्यावर नाचताहेत म्हणून तुम्ही न्यायमूर्तींना पायी कोर्टात जायला भाग पाडू शकत नाही'; उच्च न्यायालयाने सरकारला झापले
11
'सरकारचा एकही प्रतिनिधी मनोज जरांगे पाटलांना भेटायला आला नाही,' रोहित पवारांची टीका
12
सेबीचा नवा नियम! F&O ट्रेडिंगमध्ये १ ऑक्टोबरपासून पोझिशन लिमिट वाढणार; लहान गुंतवणूकदारांना फायदा
13
स्वार्थी ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'नंतरही भारताची अर्थव्यवस्था 'बम-बम'! ग्रोथ पाहून पंतप्रधान मोदीही खूश; स्पष्टच बोलले...
14
“बस… जरांगे आता थांबा! आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा, नामुष्की टाळा”; कुणी दिला सल्ला?
15
'या' देशात भाड्याने मिळते पत्नी; लग्न करून एकत्रही राहू शकता, पण मोजावे लागतील 'इतके' पैसे!
16
"काँग्रेसच्या स्टेजवरून माझ्या आईला शिवी दिली, हा अपमान..."; पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक
17
Ganesh Visarjan: गौरी-गणपतीच्या निरोपासाठी जय्यत तयारी
18
बुरख्यातली गर्लफ्रेंड निघाली मुलगा! एकत्र प्रवास करूनही ओळखू शकला नाही बॉयफ्रेंड; पुढचं ऐकून व्हाल हैराण
19
अवनीत कौरने विराट कोहलीच्या इंस्टाग्राम पोस्ट लाइकवर सोडलं मौन, म्हणाली - "मी कधीच विसरत नाही..."
20
"अकाली एक्झिट वगैरे शब्द...", प्रिया मराठेच्या निधनानंतर अभिजीतची भावुक पोस्ट

दीड लाख खर्च परतावा शून्य;टोमॅटोचे भाव उतरल्याने जुन्नरच्या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 12:29 IST

कमी कालावधीत अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या टोमॅटोचे यावर्षी भाव गडगडल्याने जुन्नरच्या तालुक्यातील गावातील शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

ओतूर : सध्या टोमॅटोचे भाव कमालीचे उतरल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अक्षरशः पाणी आले असल्याचे चित्र दिसत आहे. बळीराजा शेतात मेहनत करून स्वकर्तृत्वासह कौशल्याने उत्पादन मिळवतो; परंतु समाधानकारक भाव मिळत नसल्याने आर्थिक चणचण त्याच्या नशिबी आहे. कमी कालावधीत अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या टोमॅटोचे यावर्षी भाव गडगडल्याने जुन्नरच्या तालुक्यातील गावातील शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.शेतकरी अल्पकाळात भरपूर व रोख उत्पन्न देणारी पिके म्हणून टोमॅटो हे पीक घेतात. टोमॅटोचे पीक नगदी व भांडवली असल्याने लागवडीपासून मागणी कमी अन् उत्पन्न जास्त एक एकरास पाच हजार किलोपेक्षा अधिक उत्पन्न घेणारे शेतकरी या भागात आहेत. छोट्या-छोट्या प्लॉटच्या साह्याने जास्तीत जास्त उत्पन्न घेऊन जीवन जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांचे टोमॅटोचे भाव घसरल्याने आर्थिक नुकसान होत आहे. या भागातील टोमॅटो नारायणगाव मार्केट येथे जातो. टोमॅटोची आवक वाढल्याने दर कॅरेटचे दर २०० ते ४५० रुपयांवर आले असून, सरासरी जुन्या टोमॅटोना २०० ते ३०० रुपये बाजार आहेत मागणी कमी उत्पन्न अधिक अशी परिस्थिती आहे. अवकाळीमुळे पिकांचे नुकसान झालेले असताना देखील काही शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पीक वाढवले; परंतु त्याचे दर घसरल्याने शेतकरी कोसळू लागला आहे. केलेला खर्चही निघत नसल्याची खंत अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.लागवडीपासून प्रत्यक्ष उत्पन्न सुरू होईपर्यंत या पिकाची खूपच काळजी घ्यावी लागते. कीटकनाशक फवारणी, मशागत, खतांचा खर्च असतोच. आधार देण्यासाठी लागणाऱ्या काठ्या व तारा, सुतळ्या आणि त्यासाठी द्यावी लागणारी मंजुरी. ज्यावेळी प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात होते त्यावेळी ही खर्च मोठ्या प्रमाणात होतो; परंतु याहीपेक्षा खर्चिक काम असते ते टोमॅटो झाडांना फळे आल्यानंतर नजीकच्या काळात दरात वाढ झाली नाही तर शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होईल. शेतकरी स्थानिक बाजारपेठेत टोमॅटो विकत असून पण काही टोमॅटो उत्पादक यांनी दर नसल्याने टोमॅटो शेतात ठेवणे पसंत केले आहे.टोमॅटो फेकून देण्याची वेळदरवर्षी बाजारभाव चांगले असतात यंदा मात्र सुरुवातीपासूनच टोमॅटोला बाजारभावाची साथ मिळालीच नाही. सुरुवातीला कॅरेटला ८०० रुपये भाव होते नंतर ५००, ४५०, ३००, १५०, २०० असे दिवसागणिक बाजार बदलत आहेत यंदा उष्णतेचे अधिक प्रमाण त्यात अवकाळी पाऊस व मे महिन्यात आलेल्या सततच्या पावसामुळे टोमॅटो पांढरी माशी, करपा, काळा डाग आदी रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला. त्यातच बाजारभाव देखील कमी मिळाले त्यामुळे फेकून देण्याची वेळ. भांडवल निघणे कठीण२० किलोच्या क्रेटला केवळ २०० ते ४५० रुपये भाव मिळत आहे; पण सरासरी एकरी दीड लाख रुपये भांडवल खर्च या दरातून गुंतविलेले भांडवल तर दूरच, तोडणी मजुरी, वाहतुकीचा खर्च देखील वसूल होत नसल्याचे टोमॅटो फेकून देण्याची वेळ आली आहे. टोमॅटो हे पीक शेतकऱ्यांना कधी मालामाल, तर कधी उद्धस्त करणारे बेभरवशाचे पीक झाले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAgriculture Sectorशेती क्षेत्र