शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पक्षाच्या ढासळत्या स्थितीवर विचारविनिमय होणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 19:44 IST

-  राज्यभरातून किमान २५० पदाधिकारी येणार

पुणे : काँग्रेसचे राज्यस्तरीय निवासी चिंतन शिबिर पुण्यात ११ व १२ ऑगस्टला खडकवासला इथे होत आहे. पक्षाच्या ढासळत्या राजकीय स्थितीवर या शिबिरात चिंतन होणार का? त्यावर काही उपाय करण्याबाबत विचारविनिमय होणार का? असा प्रश्न अनेक वर्षांनी होत असलेल्या या शिबिराविषयी काँग्रेस कार्यकर्त्यांना पडला आहे.

यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील व अन्य काही काँग्रेस नेत्यांच्या शिबिरात अशी शिबिरे होत असत. काँग्रेसची स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची ती परंपराच होती. स्वातंत्र्यानंतरही ती बराच काळ सुरू होती. मात्र, पुढे ती खंडित झाली व नंतर तर बंदच झाली. पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ या शिबिर परंपरेतील आहेत. त्यामुळेच त्यांनी ही खंडित परंपरा परत सुरू केली असल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. दोन दिवसांच्या या शिबिराला पक्षाचे राज्य कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी निमंत्रित करण्यात आले आहेत.किमान २५० ते ३०० जण या शिबिराला उपस्थित असतील अशी माहिती देण्यात आली. पुणे, पिंपरी-चिंचवड व पुणे ग्रामीण यांच्याकडे या शिबिराचे यजमानपद देण्यात आले आहे. येणाऱ्या पदाधिकाऱ्यांना शिबिर स्थळी आण्यापासून ते त्यांची राहण्याची, भोजनाची व्यवस्था करण्यासाठी पक्षाने समित्या स्थापन केल्या आहेत. पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी त्यासाठी सोमवारी पुण्यातील पदाधिकाऱ्यांची काँग्रेसभवनावर खास बैठक घेतली. त्यात त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वाटून दिल्या आहेत.

वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या काही तज्ञांना, अधिकारी व्यक्तींना शिबिरात बोलण्यासाठी म्हणून खास निमंत्रीत करण्यात आले आहे. त्याचेही नियोजन केले जात आहेत. काँग्रेसचा इतिहास, ध्येेयधोरणे, विचारधारा याविषयी शिबिरात उहापोह होईल. 

अशा शिबिरांमधून पक्ष पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची वैचारिक बैठक पक्की होते. निष्ठा पक्क्या होतात. सरकारच्या चुकीच्या निर्णयांचे विश्लेषण करण्याची दृष्टी तयार होते. राजकारण म्हणजे केवळ पदांचा, सत्तेचा खेळ नाही तर समाज परिवर्तनाचे ते एक साधन आहे ही बाब मनावर बिंबते. यापुढेही वेगवेगळ्या स्तरावरील कार्यकर्त्यांसाठी अशा शिबिरांचे स्थानिक पातळीवर आयोजन केले जाईल. - हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड