शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदर विमानतळाविरोधात शेतकऱ्यांच्या बरोबर उभे राहणार : संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 09:22 IST

शासनाच्या हट्टवादी, अव्यवहारी भूमिकेचा निषेध नोंदवत सुपीक बागायती जमिनींवर विमानतळ होऊ न देण्यासाठी मी व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बरोबर उभे राहणार आहोत

सासवड :पुरंदरविमानतळाला दिवसेंदिवस विरोध वाढत चालला आहे. शुक्रवारी (दि. ३०) बाधित गावातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने शिवसेना (उबाठा) नेते खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांची भूमिका आणि या ठिकाणी विमातळ उभारणीस नक्की काय अडचण आहे, याची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर संजय राऊत यांनी शासनाच्या हट्टवादी, अव्यवहारी भूमिकेचा निषेध नोंदवत सुपीक बागायती जमिनींवर विमानतळ होऊ न देण्यासाठी मी व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बरोबर उभे राहणार आहोत, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

पुरंदर विमानतळ प्रकल्पास आमचा तीव्र विरोध असून, प्रकल्प रद्द करावा व शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत, पुरंदर परिसरात प्रस्तावित असलेला आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प हा संपूर्णपणे अन्यायकारक, शेतकरीविरोधी व पर्यावरणविरोधी आहे. सध्या ड्रोन सर्वे चालू झाला होता, त्या धास्तीने वामन वसंत मेमाने व अंजनाबाई महादेव कामठे या दोन शेतकऱ्यांच्या मृत्यू झाला आहे. पुढे देखील असे प्रसंग उद्भवू शकतात त्यामुळे शेतकऱ्यांचा विमानतळ प्रकल्पास तीव्र विरोध आहे, यामध्ये आपण लक्ष घालून शेतकऱ्यांस न्याय द्यावा. प्रकल्पासाठी लागणारी जमीन ही सुपीक, सातत्याने लागवडीत असलेली आहे. या जमिनीवर अनेक शेतकऱ्यांची उपजीविका अवलंबून आहे. जमीन गेल्यास आमच्या पिढ्यांचे भवितव्य अंधारात जाईल. हा परिसर जैवविविधतेने समृद्ध असून, अनेक डोंगर, नद्या, व जलस्रोत आहेत. विमानतळामुळे जंगलतोड, भूगर्भजल कमी होणे व नैसर्गिक साखळी तुटण्याची शक्यता आहे. विमानतळसाठी पर्यायी जागांचा विचार न केल्याची खंत व्यक्त करत अशा प्रकारचे प्रकल्प शहरी किंवा कमी लोकसंख्येच्या, सध्या वापरात नसलेल्या औद्योगिक भागांमध्ये होऊ शकतात. मात्र, ग्रामीण शेतीप्रधान क्षेत्रावर बळजबरीने लादणं अन्यायकारक आहे.

प्रस्तावित विमानतळ प्रकल्प त्वरित रद्द करण्यात यावा. प्रकल्पासाठी पर्यायी जागांचा खुला अभ्यास आणि लोकसहभागातून निर्णय घ्यावा. स्थानिक जनतेच्या मतांचा सन्मान करून कोणत्याही प्रकारचा बळजबरीचा निर्णय घेऊ नये. पर्यावरणास अनुकूल, शाश्वत विकासाचे पर्याय स्वीकारावेत. या प्रकल्पाचा पुनर्विचार करावा व आमचा आवाज शासना दरबारी मांडावा. आम्ही शांततापूर्ण मार्गाने आमचा संघर्ष सुरू ठेवू, अशा आशयाचे निवेदन शिष्टमंडळाचे वतीने खासदार संजय राऊत यांना देण्यात आले.

याप्रसंगी शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख उल्हास शेवाळे, पुरंदर तालुका प्रमुख अभिजित जगताप, विमानतळ विरोधी शिष्टमंडळाचे पी. एस. मेमाणे, वनपुरी गावचे माजी सरपंच एकनाथ बापू कुंभारकर, गणेशशेठ मोरे, पारगावचे उपसरपंच चेतन दादा मेमाणे, छावा संघटनेचे मनेष हगवणे, उद्योजक बाळासाहेब कुंभारकर, राजुनाना कुंभारकर, उदाचीवाडी गावचे सदस्य विकास कुंभारकर उपस्थित होते. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPurandarपुरंदरAirportविमानतळ