शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

गावाचे पुनर्वसन कधी होणार ? मृत्यूच्या दाढेत वसलेल्या काळवाडी गावाचे पुनर्वसन रखडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 10:00 IST

काळवाडी गाव भीमाशंकर खोऱ्यात वसलेले असून, गावाच्या वरच्या बाजूला असलेल्या डोंगरावर मोठमोठाले दगड कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीत आहेत. खालच्या बाजूला डिंभे धरणाच्या पाण्याच्या दाबामुळे गावाच्या जमिनीत मोठी भेग पडली आहे.

तळेघर : आंबेगाव तालुक्यातील काळवाडी नंबर १ आणि नंबर २ (जांभोरी) ही गावे मृत्यूच्या छायेत वसली आहेत. गावाच्या वरच्या बाजूला राक्षसी रौद्ररूप धारण करणारा भयानक डोंगर, तर खालच्या बाजूला डिंभे धरणाचे विशाल पाणलोट क्षेत्र आणि गावाच्या मध्यभागी काही वर्षांपूर्वी पडलेली मोठी भेग यामुळे ग्रामस्थ जीव मुठीत घेऊन जगत आहेत. या गावांचे तातडीने पुनर्वसन व्हावे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे.

काळवाडी गाव भीमाशंकर खोऱ्यात वसलेले असून, गावाच्या वरच्या बाजूला असलेल्या डोंगरावर मोठमोठाले दगड कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीत आहेत. खालच्या बाजूला डिंभे धरणाच्या पाण्याच्या दाबामुळे गावाच्या जमिनीत मोठी भेग पडली आहे. गेल्या आठ-नऊ दिवसांपासून मुसळधार पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. डोंगराचे पाणी झिरपून घरांच्या भिंतींना ओल येत असून, दोन-तीन दिवसांत घरे कोसळण्याची भीती आहे. गावातील घरांमध्ये पाण्याचे उबड निघत असून, डोंगरावरील दगड खाली येत आहेत.

माळीण आणि इर्शाळवाडी यांसारख्या धोकादायक गावांप्रमाणेच काळवाडी गावाचे पुनर्वसन २०१४ पासून रखडले आहे. स्थानिकांनी वारंवार प्रशासनाला याबाबत कळवूनही ठोस उपाययोजना झालेली नाही. “आमच्यावर एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? सरकारला आदिवासींची कधी कदर होणार?” असा सवाल ग्रामस्थ कोंडिबा पारधी यांनी ‘लोकमत’शी बोलताना उपस्थित केला.

पुनर्वसनासाठी प्रयत्नतात्पुरत्या उपाययोजनेसाठी ९० लाख रुपये निधी मंजूर झाला असून, यातून काळवाडी नंबर १ आणि बेंढारवाडी या गावांनी जमीन खरेदी केली आहे. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे प्रांत अधिकाऱ्यांनी पाठवलेला प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केला. काळवाडी नंबर १ साठी संरक्षक भिंतीचे काम सुरू झाले आहे, तर काळवाडी नंबर २ ची जागा खरेदी झाली आहे. मात्र, काही अडचणींमुळे पुनर्वसनाचा प्रकल्प पूर्ण होऊ शकलेला नाही. ग्रामस्थांचे म्हणणे

“रात्री डोळा लागत नाही. घरातून पाण्याचे उबड निघतात, वरचे दगड कधी खाली येतील याचा नेम नाही. सरकार लवकर आम्हाला सुरक्षित ठिकाणी हलवावे, नाहीतर आमची अवस्था माळीणसारखी होईल,” अशी भीती कोंडिबा पारधी यांनी व्यक्त केली. सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल पारधी यांनी सांगितले की, “काळवाडी नंबर १ आणि बेंढारवाडी यांनी जमीन खरेदी केली असली, तरी पुनर्वसन रखडले आहे.” 

तातडीने पुनर्वसनाची गरज३० जुलै येताच ग्रामस्थांच्या अंगावर शहारे येतात. पावसाळ्यात रात्री झोप लागत नाही, अशी स्थिती आहे. चिमाजी पारधी, कावजी पारधी, सोमा लोहकर, नामदेव भोकटे, सुरेश भवारी, बबन पारधी, चंद्रकांत पारधी यांनी प्रशासनाला तत्काळ पुनर्वसनाची मागणी केली आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड