महायुतीच्या कुठल्या पक्षासोबत आमची युती होणार नाही - प्रशांत जगताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 20:03 IST2025-11-11T20:01:13+5:302025-11-11T20:03:03+5:30
पुणे शहरात महायुतीच्या विरोधात आम्ही लढाई लढली आहे. आमची आघाडी महाविकास आघाडीसोबत होणार

महायुतीच्या कुठल्या पक्षासोबत आमची युती होणार नाही - प्रशांत जगताप
पुणे : आगामी पुणे महापालिका निवडणुक महाविकास आघाडी म्हणुनच आम्ही लढणार आहोत. महायुतीच्या कुठल्या पक्षासोबत आमची युती होणार नाही असे राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.
पुणे शहरात महायुतीच्या विरोधात आम्ही लढाई लढली आहे. आमची आघाडी महाविकास आघाडीसोबत होणार आहे. पुणे शहराचे महायुतीने वाटोळे केले आहे महायुतीच्या कुठल्याच पक्षासोबत युती करण्याचा आमचा विचार नाही मनसेला सोबत घेण्याचा निर्णय माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार घेणार आहेत असे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले. कोल्हापूरमध्ये फक्त चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीची युती झाली आहे .पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर आमच्या कार्यकर्त्यामध्ये चर्चा नाही .
पुण्यात सर्व प्रभागात चांगले उमेदवार मिळणार आहेत .आमच्याकडे पण लवकरच इनकमिंग होणार आहे .पुणे महापालिकत राष्ट्रवादी कॉग्रेस शरदंचद्र पवार पक्षाचा महापौर होईल , असे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी सांगितले.