पुणे : छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रोटोकॉल भंगाच्या कथित प्रकारामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. माजी जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके यांनी अचानक भाषण सुरू केल्याने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना काही क्षण ताटकळत उभे राहावे लागल्याची घटना घडली.
कार्यक्रमात भाषणे सुरू असताना आमदार शरद सोनवणे यांनी आपले मनोगत संपवून थेट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भाषणासाठी निमंत्रित केले. त्यावेळी सोनवणे यांच्या हातातील माईक घेत आशाताई बुचके यांनी “मला घोषणा द्यायची आहे,” असे सांगत थेट भाषणालाच सुरुवात केली. सुमारे दीड ते दोन मिनिटे त्यांनी मनोगत व्यक्त केले.
या दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या व्यासपीठावर भाषणासाठी तयार असताना त्यांच्या मागे उभ्या राहिल्या. अचानक सुरू झालेल्या या भाषणामुळे उपस्थितांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावरही नाराजीचे भाव दिसून आल्याची चर्चा रंगली. त्यांनी हातवारे करून भाषण थांबवण्याची सूचना केल्याचे उपस्थितांनी सांगितले. आशाताई बुचके यांनी भाषण आटोपते घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपले अधिकृत मनोगत व्यक्त केले. मात्र या प्रकारामुळे प्रोटोकॉलचा भंग झाल्याची चर्चा कार्यक्रमानंतर राजकीय आणि सोशल मीडियावर जोर धरत असून बुचके यांना ट्रोलही केले जात आहे.
Web Summary : Shiv Jayanti event in Pune sees protocol questioned as Asha Buchke unexpectedly speaks, delaying Deputy CM Sunetra Pawar. This led to visible reactions from attendees and online criticism of Buchke after the event.
Web Summary : पुणे में शिव जयंती कार्यक्रम में प्रोटोकॉल पर सवाल उठे क्योंकि आशा बुचके ने अप्रत्याशित रूप से भाषण दिया, जिससे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार को देरी हुई। इससे उपस्थित लोगों की दृश्यमान प्रतिक्रियाएं हुईं और घटना के बाद बुचके की ऑनलाइन आलोचना हुई।