ओतूर : नगर-कल्याण महामार्गावर अहीनवेवाडी फाटा येथील माऊली कृषी केंद्राजवळ आज सायंकाळी सुमारास सहा वाजेच्या दरम्यान धक्कादायक घटना घडली. मोटरसायकलवरून खताची गोणी घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यावर अचानक बिबट्याने झडप घातल्याने एकच खळबळ उडाली.मिळालेल्या माहितीनुसार, निलेश सीताराम डोके (रा. आंबेगव्हाण, ता. जुन्नर) हे मोटरसायकलवरून घरी जात असताना रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तात्काळ आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून धडक दिल्यानंतर बिबट्या तिथून पसार झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
Web Summary : A leopard collided with a motorcycle on the Nagar-Kalyan highway near Otur, seriously injuring a farmer. Nilesh Doke was struck while carrying fertilizer. Locals rushed him to a private hospital. Fear grips the area, with villagers demanding immediate action from the forest department to install cages.
Web Summary : ओतुर के पास नगर-कल्याण राजमार्ग पर एक तेंदुए ने मोटरसाइकिल को टक्कर मार दी, जिससे एक किसान गंभीर रूप से घायल हो गया। निलेश डोके खाद ले जाते समय चपेट में आ गए। ग्रामीणों ने उन्हें तुरंत एक निजी अस्पताल पहुंचाया। इलाके में दहशत, ग्रामीणों ने वन विभाग से पिंजरे लगाने की तत्काल कार्रवाई की मांग की।