शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

कुलगुरू महाेदय, तुम्हीच सांगा विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटणार कसे अन् विद्यापीठाची प्रतिमा सुधारणार कशी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 10:55 IST

कुलगुरूंकडून विद्यापीठातील वसतिगृह समस्येवर त्वरित तोडगा हवा

पुणे : ‘‘हॅलाे, वसतिगृहाचा प्रश्न आहे. कुलसचिवांना फाेन करा. भाेजनगृहाची समस्या आहे, तरीही कुलसचिवांना फाेन करा. विभागातील प्रश्न आहे, कुलसचिवांनाच फाेन करा...’’ हे अनेकांचे ठरलेले उत्तर. कुलसचिवांचे मात्र ठरलेले... फाेन उचलायचाच नाही. याला माध्यम प्रतिनिधी देखील अपवाद नाहीत. यात भरडला जाताेय विद्यार्थी अन् डागाळली जातेय विद्यापीठाची प्रतिमा. एक तर कुलसचिवांनीच संबंधित विभागप्रमुखांना आदेश दिलेले की, माझ्याशिवाय माध्यमांशी काेणीही बाेलायचे नाही; अन् स्वत:ही बाेलायचे नाही. कुलगुरू महाेदय, तुम्हीच सांगा विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटणार कसे अन् विद्यापीठाची प्रतिमा सुधारणार कशी? असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.

जागतिक मानांकनात विद्यापीठाचा रँक वाढलेला असला तरी विद्यापीठातील समस्या सोडविण्यात ते कमी पडत आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रवेश प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून, बहुतांश विभागांमध्ये वर्ग सुरू झाले आहेत. त्यामुळे प्रवेश मिळालेले विद्यार्थी शैक्षणिक नुकसान हाेऊ नये म्हणून तातडीने विद्यापीठ गाठत आहेत. पण, वसतिगृह प्रवेश रखडल्याने राहायचं कुठे? हा प्रश्न त्यांना भेडसावत आहे. वसतिगृहात किती विद्यार्थ्यांनी अर्ज केला, किती विद्यार्थ्यांना प्रवेश दिला, याची माहिती कोणीही देत नाही.

आम्ही दाद मागायची कुणाकडे?गाव खेड्यातील, अतिशय दुर्गम भागातील सामान्य कुटुंबात जन्म घेतलेली मी सामान्य मुलगी. विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर येताच अनेक वर्षांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण हाेत असल्याची भावना मनात हाेती. राहायला वसतिगृह मिळणार, या विचाराने मी सर्व साहित्य घेऊन आले हाेते. पण, वसतिगृह काही मिळत नाही अन् बाहेर राहणे परवडत नाही, अशी आमची व्यथा असल्याचे एका मुलीने सांगितले....ही तर लूट

विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहाची क्षमता साधारणत: १४०० काॅटची आहे. बहुतांश विभाग सुरू झाल्याने वसतिगृह प्रवेश तातडीने देण्याऐवजी ज्या मुली दिवसाला शंभर रुपये भरून राहू शकतील त्यांनाच राहण्याची व्यवस्था करायची, मग गरीब घरच्या मुलींनी काय करायचं? ग्रामीण आणि दुर्गम भागातून अतिशय कष्टाने पुण्यात आलेल्या मुला-मुलींनी काय करायचं? निवारा मिळेना, म्हणून सावित्रीच्या लेकीने शिक्षण साेडून गावी परत जायचं का? असा सवाल उपस्थित होत आहे.

शिक्षणासाठी बाहेरगावाहून आलेल्या प्रत्येक मुलीला वसतिगृह देण्याचा आमचा प्रयत्न असेल. राहायची साेय झाली नाही म्हणून शिक्षण साेडावे लागेल अशी वेळ कुणावर येणार नाही. फक्त काही प्रक्रिया पार पडण्यासाठी थाेडा वेळ लागत आहे. त्यातही तातडीने दुरुस्ती केली जाईल. - डाॅ. सुरेश गाेसावी, कुलगुरू

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडuniversityविद्यापीठ