कात्रज : जांभुळवाडी येथील तलावात बुधवारी सायंकाळी पोहण्यासाठी गेलेल्या एका १३ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.मृत मुलाचे नाव बादल शब्बीर शेख (वय १३, रा. सच्चाई माता मंदिर, कात्रज) असे असून, तो आपल्या भाऊ मुनीर शब्बीर शेख (वय १५) आणि शाळकरी मित्रांसोबत तलावात पोहण्यासाठी गेला होता. पोहताना बादल अचानक खोल पाण्यात गेला आणि बुडाला.घटनेची माहिती मिळताच आंबेगाव पोलिस स्टेशन व अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. तलावात शोधमोहीम राबवून अग्निशमन दलाने बादलचा मृतदेह बाहेर काढला.मुलाला पोहता येत नसतानाही तो पाण्यात उतरल्याने ही दुर्घटना घडल्याची माहिती आंबेगाव पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने यांनी दिली. दरम्यान, या मोहिमेत कात्रज अग्निशमन दलाचे अधिकारी संतोष भिलारे, फायरमन अनिकेत पवार, अविनाश जाधव, प्रतीक शिर्के आणि विनायक घागरे यांनी सहभाग घेतला.
Web Summary : A 13-year-old boy, Badal Sheikh, drowned in Jambhulwadi Lake near Katraj while swimming with friends. Firefighters recovered his body after a search. Police say he entered the water despite not knowing how to swim, leading to the tragic accident.
Web Summary : पुणे के जांभुलवाड़ी झील में तैरते समय बादल शेख नामक 13 वर्षीय लड़के की डूबने से मौत हो गई। वह अपने दोस्तों के साथ तैरने गया था। पुलिस के अनुसार, उसे तैरना नहीं आता था और इस कारण यह दुखद घटना हुई।