शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० हून अधिक फोन, आईनं पाठलाग केला तरीही ते थांबले नाहीत; २ मित्रांचा रहस्यमय मृत्यू
2
भारतात खटला सुरू झाल्यानं मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वुर राणाचं टेन्शन वाढलं...! वकिलाला विचारला हा एक प्रश्न
3
Maharashtra Politics :"लालबाग परळ म्हणजे कट्टर शिवसैनिक , मी सुधीरला मुंबईत पळवणार"; ठाकरेंची बीएमसीसाठी मोठी तयारी
4
५४६ मुलींचे अश्लील व्हिडीओ, तो कॅफे अन् महाराष्ट्र कनेक्शन... वाराणसी गँगरेप प्रकणात धक्कादायक माहिती उघड
5
Vinesh Phogat : "२ रुपयांसाठी ट्विट करणाऱ्या, मोफत ज्ञान देणाऱ्या...”; विनेश फोगटचं टीकाकारांना चोख प्रत्युत्तर
6
ॲल्युमिनियम फॉइलचा वापर करणं आरोग्यासाठी घातक; ‘या’ गंभीर आजारांचा धोका
7
मेजर इक्बाल अन् समीर अली कोण आहेत, शिवसेना भवनात घुसण्याचा प्रयत्न केला? तेहव्वूर राणा मोठा खुलासा करणार
8
रेल्वेच्या तात्काळ तिकिट बुकिंगची वेळ बदलली आहे का? IRCTC ने स्वतःच केलं स्पष्ट
9
"...म्हणून फारसे हिंदी सिनेमे केले नाही", गश्मीरने सांगितलं कारण; 'छोरी २' मधून केलं हिंदीत कमबॅक
10
कोणत्या खास अभिनेत्रीबद्दल आकर्षण निर्माण झालं का? लक्ष्याने दिलं होतं असं उत्तर की सर्वजण खळखळून हसले
11
भारतासमोर चीन अन् पाकिस्तान टिकणार नाहीत! अमेरिकन F-35, रशियन Su-57 पेक्षाही मजबूत लढाऊ विमाने बनवणार
12
"मी माझ्या मुलीला कसं मारू?..."; मुलीनं पळून जाऊन केले लग्न; बापाने स्वत:ला गोळी झाडली
13
दोन भागात विभागली जातेय भारताची भूमी, कधीही होऊ शकतो विध्वंसक भूकंप, चिंताजनक माहिती समोर
14
तुमचे क्रेडिट कार्ड Google Pay शी कसे लिंक करावे? स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया जाणून घ्या
15
उद्धव ठाकरेंनी दिली होती जबाबदारी; ४ दिवसातच प्रवक्त्या व उपनेत्या शिंदेसेनेत दाखल
16
अजित पवारांकडून सूरज चव्हाणच्या घराच्या बांधकामाची पाहणी, दिल्या महत्त्वाच्या सूचना
17
आयपीएलमध्ये तीन ऑस्ट्रेलियन्स भिडले, मैदानावर नेमके काय घडले? ट्रॅव्हिस हेडचा मोठा दावा
18
Taapsee Pannu : मायेची फुंकर! तळपत्या उन्हात गरिबांसाठी देवदूत ठरली तापसी पन्नू; वाटले पंखे आणि कूलर
19
विशाल गवळीची हत्या केली, त्याला फसवलं गेलंय; विशालच्या कुटुंबीयांचा आरोप
20
आता फ्लॅटच्या देखभाल खर्चावरही लागणार GST! सरकारच्या निर्णयाने मध्यमवर्गीयांना धक्का

“काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं” काल शरद पवारांसोबत साताऱ्यात भेट आज बारामतीत अजित पवार म्हणाले…

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 16:56 IST

पीआयला सांगितला आहे. काकालाही म्हणलं विश्वासात घ्या, कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं

सुपे : मी त्या एका रस्त्याबद्दल सांगितलं आहे. त्याबद्दल सहकार्य करा. मी बीडीओला सांगितलं आहे, तहसीलदाराला सांगितला आहे, पीआयला सांगितला आहे. काकालाही म्हणलं विश्वासात घ्या, कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं. त्याशिवाय पुढे काहीच चालत नाही.

अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. नाहीतर काका कुतवळ, नाहीतर लगेच तुम्ही म्हणाल दादा घसरले, दादा कोणावर घसरले नाहीत, असंही अजित पवार मिश्किलपणे म्हणाले. बारामती तालुक्यातील सुपे परिसरातील बोरकरवाडी तलावात पाईपलाईनद्वारे जनाई उपसा जलसिंचन योजनेचे पाणी सोडण्यात आले. बोरकरवाडी तलावात आलेल्या पाण्याचे पुजन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.बोरकरवाडी येथील सुमारे १३०० मिटर पाईपलाईन टीसीएस फौडेशनच्या सीएसआर निधीतून सुमारे २ कोटी ९० लाख खर्चाचे काम करण्यात आले आहे. जनाई उपसा जलसिंचन योजनेच्या उजवा कालवा ते बोरकरवाडी तलावापर्यत पाईपलाईनचे काम करण्यात आले आहे. मात्र त्यातील राहिलेले २०० मिटरचे काम निधी मिळताच लवकरच पुर्ण करण्यात येईल असे पवार यांनी सांगितले. यावेळी लाडक्या बहिणीकडे लक्ष दिले. त्यावेळी आमच्यावर टीका झाली. निवडणूक झाली योजना बंद करतील. पण, तसे आम्ही केलं नाही. योजना सुरू ठेवली. मी जोपर्यंत लोकप्रतिनिधी आहे तोपर्यंत मी अडचण येऊ देणार नाही.

पुरंदर विमानतळ काम हातात घेतले आहे. लोकं विरोध करत आहेत, पण विमानतळ केल्याशिवाय पर्याय नाही. आम्ही सरकार म्हणून बसलो आहे. मी गरीबावर अन्याय होऊ देणार नाही. कामे हवेत होणार नाही. त्यासाठी जागा लागेल. जातीय सलोखा असला पाहिजे. कुठे कायतरी झालं म्हणून मारहाण करायची हे चालणार नाही. आपण भारतीय आहोत. आपण शाहू, फुले, आंबेडकर यांचा विचाराने राहिले पाहिजे, असंही अजित पवार म्हणाले. जे बोललो ते शंभर दिवसांत करुन दाखवलं -विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी बोरकरवाडीच्या ग्रामस्थांनी केलेल्या मागणीनुसार जानाई उपसा सिंचन योजनेतील पाणी पाईपलाईनद्वारे बोरकरवाडीच्या तलावात आणून सोडण्याचे पवार यांनी आश्वासन दिले होते. त्यानुसार निवडणुकित जे बोललो ते शंभर दिवसात करुन दाखवलं असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहिर सभेत सांगितले. तसेच सुप्यातील प्रारुप विकास आराखड्यामध्ये काहीच्या जागा जात आहेत. त्या गरिबांना मी वाऱ्यावर सोडणार नाही. कारण विकास कामे करताना अडचणीं येतातच मात्र त्यातुन मार्ग काढावा लागतो असे पवार यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारBaramatiबारामती