पुणे :पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) अंतर्गत येणाऱ्या रिक्षा, टेम्पो, टँकर, बस आदी सर्व परिवहन संवर्गातील वाहनांचे फिटनेस रिन्युअल व पासिंगचे कामकाज गेल्या दोन दिवसांपासून पूर्णपणे ठप्प झाले आहे. केंद्र सरकारच्या परिवहन विभागाने काढलेल्या नव्या अधिसूचनेनुसार या वाहनांचे पासिंग आता ऑटोमॅटिक मशीनद्वारे करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, संबंधित यंत्रणा अद्याप कार्यान्वित न झाल्याने पुणे आरटीओच्या अखत्यारीतील सर्व ठिकाणी पासिंग प्रक्रिया बंद आहे.
या निर्णयाचा मोठा फटका वाहनचालक व मालकांना बसत असून, त्यांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. पासिंगशिवाय वाहने रस्त्यावर आणता येत नसल्याने वाहतूकदारांचे दैनंदिन उत्पन्न ठप्प झाले आहे. अनेक वाहनचालकांवर कर्जाचे हप्ते, चालकांचे वेतन आणि इतर खर्चाचे ओझे असून, परिस्थिती गंभीर बनली आहे. याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य वाहन चालक - मालक प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बाबा शिंदे, विद्यार्थी वाहतूक संघटनेचे बापू भावे यांनी केली आहे. परिवहन आयुक्त कार्यालयात झालेल्या चर्चेनुसार उद्या किंवा परवा यासंदर्भात निर्णय अपेक्षित असून, निर्णय झाल्यानंतर पुन्हा आरटीओ निरीक्षकांकडून वाहन तपासणी करून पासिंग प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
Web Summary : Pune RTO's vehicle passing is stalled due to new automated regulations. Owners and drivers are facing financial losses as vehicles are unable to operate. A solution is expected soon after discussions with transport officials, potentially resuming inspections.
Web Summary : नए स्वचालित नियमों के कारण पुणे आरटीओ में वाहन पासिंग रुकी। मालिक और चालक वित्तीय नुकसान का सामना कर रहे हैं क्योंकि वाहन चलने में असमर्थ हैं। परिवहन अधिकारियों के साथ चर्चा के बाद जल्द ही समाधान की उम्मीद है, संभावित रूप से निरीक्षण फिर से शुरू हो सकता है।