शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

आता पुण्यातही झळकणार तीन अक्षरी वाहन नंबर; प्रादेशिक परिवहन विभागाकडून मोठा बदल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 09:27 IST

राजधानी दिल्लीनंतर तीन अक्षरी सिरीज सुरू करणारे पुणे हे दुसरे शहर ठरणार आहे.

पुणे : झपाट्याने वाढणाऱ्या वाहनसंख्येमुळे आता वाहन क्रमांकांच्या सिरीजमध्ये मोठा बदल होणार आहे. दोन इंग्रजी अक्षरांची मालिका संपत आल्याने प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) तीन इंग्रजी अक्षरांची नवी सिरीज सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता नवे नंबर रस्त्यावर झळकताना दिसणार आहेत. राजधानी दिल्लीनंतर तीन अक्षरी सिरीज सुरू करणारे पुणे हे दुसरे शहर ठरणार आहे.

सध्या पुणे आरटीओमध्ये (एमएच १२) दुचाकी, चारचाकी आणि इतर वाहनांसाठी दोन अक्षरी मालिका सुरू आहे. यामध्ये सध्या 'झेडके' (झेडके) ही मालिका वेगाने संपुष्टात येत आहे. शिवाय, पुण्यात दुचाकी वाहन क्रमांकाची मालिका संपण्यास फक्त १५ दिवस लागतात. तर चारचाकी वाहनांसाठी मालिका संपण्यास दोन महिने लागतात. सध्या शहरात ४३ लाखांहून अधिक वाहनांची नोंदणी झाली आहे. यामध्ये जवळपास ३० लाख दुचाकी आहेत. 

दरवर्षी सुमारे ३ लाख नवीन वाहनांची भर पडत असल्याने सध्याची ‘झेडके’ सिरीज वेगाने संपत चालली आहे. दुचाकींसाठी सिरीज केवळ १५ दिवसांत संपते, तर चारचाकींसाठी दोन महिने लागतात. गुढीपाडवा, दसरा, अक्षय तृतीया, दिवाळी पाडवा आणि लक्ष्मी पूजन यांसारख्या मुहूर्तांवर वाहन खरेदी मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे त्या काळात सिरीज आणखी वेगाने संपते. नवीन तीन अक्षरी सिरीज ‘एएए’ पासून सुरू होणार असून, भविष्यातील ३०-४० वर्षांची गरज लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे, असे आरटीओ प्रशासनाकडून सांगण्यात आले.

असे होणार फायदा :

-अधिक क्रमांक उपलब्ध होणार

-फॅन्सी नंबरसाठी जास्त पर्याय

-महसूल वाढण्याची शक्यता

-नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ

-फॅन्सी नंबरमुळे महसूल वाढणार

 आरटीओच्या महसुलात वाढ होणार :

तीन अक्षरी मालिकेमुळे ‘चॉइस नंबर’ घेणाऱ्यांसाठी अधिक पर्याय उपलब्ध होतील. शब्द तयार होण्याची संधी वाढल्याने शौकीन वाहनधारकांकडून आरटीओला मोठा महसूल मिळणार आहे. पुण्यातील वाढती वाहन संख्या लक्षात घेता, दोन अक्षरी सिरीज पुरेशी राहिलेली नाही. त्यामुळे तीन अक्षरी सिरीज सुरू करणे आवश्यक झाले आहे. यामुळे पुढील अनेक वर्षे क्रमांकांची कमतरता भासणार नाही. तीन अक्षरी मालिकेमुळे नवीन क्रमांकांचे पर्याय उपलब्ध होतील. तसेच यामध्ये शब्द तयार होण्याची संधी असल्याने ‘चॉइस नंबर’ घेणाऱ्यांचे प्रमाण वाढणार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Pune to Get Three-Letter Vehicle Numbers: RTO Announces Major Change

Web Summary : Pune RTO introduces three-letter vehicle number series due to rapid vehicle growth. Following Delhi, it's the second city to implement this, offering more number options and boosting revenue.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेRto officeआरटीओ ऑफीस