शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

वडगाव काशिंबेग येथे तीन बिबट्यांचा थरार; शेतमजुराच्या सतर्कतेने वासरू बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 17:13 IST

ग्रामस्थांनी वन विभागाकडे बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.

मंचर : श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग येथील शेटेमळा परिसरात शेतकरी सुखदेव मार्तंड शेटे यांच्या घरासमोर बुधवारी पहाटे दीडच्या सुमारास तीन बिबट्यांनी धुमाकूळ घातला. यापैकी एका बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या वासरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु जवळच झोपलेल्या शेतमजुराच्या सतर्कतेमुळे वासरू थोडक्यात बचावले. हा सर्व थरार घराबाहेर आणि गोठ्यात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.सुखदेव शेटे यांच्या घरालगत शेती आणि गोठा आहे, जिथे पाच दुभत्या गाई आणि त्यांची वासरे बांधली जातात. सुरक्षेच्या दृष्टीने घराबाहेर आणि गोठ्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. यापूर्वीही बिबट्याने गोठ्यातील एका वासराला ठार केले होते. बुधवारी पहाटे तीन बिबटे एकामागोमाग शेटे यांच्या अंगणात शिरले. त्यापैकी एकाने गोठ्यातील वासरावर झडप घेतली. वासराच्या हालचालीने आणि आवाजाने जागा झालेल्या शेतमजुराने पांघरूण फेकले आणि काठीने खाटेवर मारत आरडाओरड केली. यामुळे घाबरलेला बिबट्या पळून गेला. सुदैवाने मजुरावर हल्ला झाला नाही, परंतु तो बराच वेळ घाबरलेल्या अवस्थेत होता.या परिसरात बिबट्यांचा वावर वाढला असून, यापूर्वी अनेक पाळीव जनावरे ठार झाली आहेत. ग्रामस्थांनी वन विभागाकडे बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. वन विभागाने सांगितले, “वडगाव काशिंबेग येथे तीन बिबटे आढळल्याची माहिती मिळाली आहे. आम्ही लवकरच पाहणी करून योग्य उपाययोजना करू.” तसेच, नागरिकांना रात्री उघड्यावर न झोपणे, घराभोवती प्रकाशाची व्यवस्था करणे आणि बिबट्याला चिडवू नये असे आवाहन वन विभागाने केले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडleopardबिबट्या