शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Pune Ganpati Festival : यंदाचा गणेशोत्सव दहा नव्हे अकरा दिवसांचा; ब्रह्ममुहूर्त पहाटे ४:५० ते दुपारी १:५३ वाजेपर्यंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 11:22 IST

प्रतिष्ठापना केलेल्या गणेशमूर्तीचे विसर्जन होणे आवश्यक

पुणे : 'वक्रतुंड', 'एकदंत', 'कृष्णपिंगाश्च', 'गजवक्र', 'लंबोदर' अशा विविध अकरा विशेष नामांनी परिचित असलेल्या श्रीगणरायाचे आज (बुधवारी) आगमन होत आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेश चतुर्थी आहे. या दिवशी ब्रह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे ४:५० ते दुपारी १:५३ वाजेपर्यंत आपल्या आणि गुरुजींच्या सोयीने घरातील गणेशाची स्थापना आणि पूजन करता येईल. त्याकरिता भद्रादी (विष्टि) कोणतेही कुयोग वर्ज्य करण्याची किंवा विशिष्ट मुहूर्ताची आवश्यकता नाही. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना मध्यान्हानंतरदेखील करता येऊ शकते. विशेष म्हणजे, यंदाचा गणेशोत्सव हा दहा नव्हे अकरा दिवसांचा असणार आहे, अशी माहिती दाते पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली.

ज्या गणेशाचे आवाहन आपण सुमुहूर्तमस्तु म्हणजे तू स्वताच एक सुमुहूर्त आहेस, असे म्हणून करतो. त्याच्या पूजनासाठी विशिष्ट नक्षत्र, योग, विष्टिकरण तसेच राहूकाल, शिवालिखित आदी कोणतीही कोष्टके पाहण्याची आवश्यकता नाही. प्रातः कालापासून मध्यान्हापर्यंत कोणत्याही वेळी स्थापना व पूजा करता येते. श्रीगणेश चतुर्थीच्या आधी एक दिवस किंवा त्याचदिवशी सकाळी मूर्ती आणावयास पाहिजे असे नाही, तर दुकानातून गणपतीची मूर्ती ८ ते १० दिवस आधीसुद्धा आणून घरामध्ये ठेवता येते. घरातील गणेशमूर्ती जास्तीत जास्त एक वितभर उंचीची आणि आसनस्थ असावी. असे पंचांगकर्ते मोहन दाते यांनी म्हटले आहे. 

प्रतिष्ठापना केलेल्या गणेशमूर्तीचे विसर्जन होणे आवश्यकपुढील वर्षी ज्येष्ठ अधिकमास असल्याने श्रीगणेशाचे आगमन उशिरा होईल. दि. १४ सप्टेंबर २०२६ रोजी श्रीगणेश चतुर्थी असणार आहे. घरात गर्भवती स्त्री असतानाही गणपती विसर्जन करावे. काही कुटुंबांत दीड दिवस, पाच व सात, तर काही घरांत अनंत चतुर्दशीपर्यंत उत्सव साजरा केला जातो. काही जणांकडे घरामध्ये गर्भवती असताना गणपती विसर्जन न करण्याची पद्धती आहे. पण, ती बरोबर नाही. घरात गर्भवती स्त्री असताना गणपती विसर्जन करता येते. अशा वेळी विसर्जन न करण्याची प्रथा चुकीची आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रतिष्ठापना केलेल्या गणेशमूर्तीचे विसर्जन होणे आवश्यक आहे आणि ते वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावे असे नसून, पाण्यात विसर्जन करावे असे आहे, असेही दाते यांनी नमूद केले.

टॅग्स :PuneपुणेGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPune Ganpati Festivalपुणे गणेशोत्सवMaharashtraमहाराष्ट्र