शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीच्या विमानतळावर नाइट लँडिंगचा मार्ग मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 15:23 IST

- अर्थसंकल्पात तरतूद; उद्योगाला मिळेल चालना

बारामती : बारामती विमानतळावर नाइट लैंडिंगसाठी आवश्यक सोयीसुविधा उभारण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. राज्य शासनाने शुक्रवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात बारामतीसह लातूर, अमरावती आणि यवतमाळ येथील विमानतळांवर नाइट लँडिंग सुविधा निर्माण करण्यासाठी निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे विमानतळाच्या विकासाला नवे बळ मिळणार आहे.

बारामती बारामती विमानतळावर नाइट लँडिंगची सोय करणार असल्याची घोषणा दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध कार्यक्रमांतून अनेकदा केली होती. त्यानुसार बारामती एमआयडीसीतील विमानतळ रिलायन्सकडून राज्य शासनाकडे हस्तांतरीत करण्यात आले होते. आता अर्थसंकल्पात निधीची तरतूद झाल्याने नाइट लैंडिंगसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचे पहिले पाऊल पडले आहे.बारामती हे विकासाचे रोल मॉडेल म्हणून ओळखले जात असले तरी उद्योगांना पूरक दळणवळणाच्या सुविधा वाढविण्याची गरज अधोरेखित होत होती. या पार्श्वभूमीवर बारामती जनसन्मान यात्रेत अजित पवार यांनी विमानतळावर नाइट लँडिंगची घोषणा केली होती. त्यानंतर विमानतळ शासनाकडे घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. आता निधी उपलब्ध झाल्याने विमानतळाचा कायापालट होण्याची शक्यता आहे.अपघाताची आठवण अजूनही आहे ताजी याच बारामती विमानतळावर विमान उतरवताना झालेल्या अपघातात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले होते. त्या घटनेनंतर हे विमानतळ देशभर चर्चेत आले. अपघातानंतर 3 विमानतळावरील सुरक्षेबाबतच्या अनेक त्रुटी समोर आल्या होत्या. आता नाइट लँडिंगसह आधुनिक सुविधा उभारल्या जाणार असल्याने या त्रुटी दूर होण्यास मदत होणार आहे.मात्र, बारामतीकरांपासून 3 त्यांच्या लाडक्या नेत्याला हिरावून नेणारा तो अपघात आजही नागरिकांच्या मनात कायम घर करून आहे. बारामती शहराला पालखी महामार्गासह विविध महत्त्वाचे महामार्ग जोडले गेले आहेत. त्यात विमानसेवेची सुविधा अधिक मजबूत झाल्यास बारामतीची दळणवळणाच्या नकाशावर ओळख आणखी ठळक होणार आहे. नाइट लँडिंगची सुविधा उपलब्ध झाल्यास उद्योजकांना 'एअर कनेक्टिव्हिटी' मिळणार असून, 'हॉपिंग' विमानसेवाही सुरू होऊन परिसरात गुंतवणूक वाढून उद्योगाला चालना मिळेल आणि रोजगारनिर्मितीही वाढेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Baramati Airport Cleared for Night Landings with State Funding

Web Summary : Baramati airport is set for night landings after state budget allocation. Funding will enhance infrastructure, fulfilling a long-awaited promise. This boosts connectivity, industry, and honors a leader's vision despite past tragedies.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र