शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

अचानक संपर्क तुटला..! उत्तराखंडमध्ये अडकले पुण्यातील २२ पर्यटक;नातेवाईक चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 17:17 IST

१९९० च्या दहावी बॅचमधील वर्गमित्र असून, १ ऑगस्ट रोजी पर्यटनासाठी निघाले होते. त्यांनी बारकोट येथे मुक्काम केल्यानंतर ५ ऑगस्ट रोजी उत्तरकाशीमार्गे गंगोत्री दर्शनासाठी गेले. त्यानंतर त्यांचा मोबाईल संपर्क पूर्णतः तुटलेला आहे.

आंबेगाव (पुणे जि.) -  उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यात धराली परिसरात झालेल्या भीषण ढगफुटीमुळे गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील सुमारे २२ पर्यटक अडकले असून, गेल्या २४ तासांपासून त्यांच्याशी संपर्क न झाल्याने नातेवाईकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे.अधिकच्या माहितीनुसार, ही मंडळी श्री भैरवनाथ विद्यालयातील १९९० च्या दहावी बॅचमधील वर्गमित्र असून, १ ऑगस्ट रोजी पर्यटनासाठी निघाले होते. त्यांनी बारकोट येथे मुक्काम केल्यानंतर ५ ऑगस्ट रोजी उत्तरकाशीमार्गे गंगोत्री दर्शनासाठी गेले. त्यानंतर त्यांचा मोबाईल संपर्क पूर्णतः तुटलेला आहे.ढगफुटीमुळे परिसरात वीजपुरवठा ठप्प झाला असून, दूरसंचार यंत्रणा देखील कोलमडल्याने संपर्क साधणं अशक्य झालं आहे. यामुळे अडकलेल्या पर्यटकांबाबत काही काळ निश्चित माहिती उपलब्ध नव्हती. मात्र, मंचर येथील प्रांत अधिकारी गोविंद शिंदे यांनी उत्तराखंड प्रशासनाशी संपर्क साधल्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार, सर्व २२ पर्यटक सुरक्षित आहेत. तर राज्याचे माजी सहकार मंत्री आणि आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी थेट संपर्क साधत मदतीची विनंती केली आहे. त्यांनी सांगितलं की, उत्तराखंडमधील स्थानिक प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांशी सतत संपर्क ठेवत पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.उत्तराखंड आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, गंगोत्री परिसरातील सर्व यात्रेकरू सुरक्षित आहेत. मात्र ढगफुटीमुळे वीज व संपर्क सुविधा खंडित झाल्यामुळे काही काळ संभाषण होणं शक्य नसलं, तरी परिस्थिती नियंत्रणात असल्याचंही सांगण्यात आलं आहे. संबंधित पर्यटकांचे नावे अद्याप जाहीर करण्यात आली आहे, तर नातेवाइक व गावकरी प्रशासनाकडून सातत्याने संपर्क साधत आहेत. परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून, स्थानिक प्रशासनाच्या मदतीने लवकरच हे पर्यटक महाराष्ट्रात सुखरूप परत येतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.या पर्यटकांची नावे पुढील प्रमाणे : अशोक भोर, सविता काळे ,अशोक टेमकर, लीला रोकडे ,माणिक ढोरे, मारुती शिंदे, समृद्धी जंगम, सतीश मेंगडे, लीना जंगम, पुरुषोत्तम, संगीता वाळुंज, गहिनीनाथ शिंदे, अरुण सातकर, विठ्ठल खेडकर, सुनिता ढोले ,नितीन जाधव, मंगल अशी या पर्यटकांची नावे आहेत.  

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड