शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

स्टार्टअप्सना व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य करण्यासाठी राज्य सरकार संधी देणार : देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 14:17 IST

पारंपरिक स्त्रोतातून वीज तयार केल्याने प्रदूषणात वाढ होत आहे.

पुणे : नवउद्यमींच्या कल्पनांचे स्टार्टअप आणि स्टार्टअपचे रूपांतर व्यवसायात करण्यासाठी राज्य सरकारने भारतीय लघुउद्योग विकास बँकेसोबत (सिडबी) करार केला आहे. या माध्यमातून १०० कोटी रुपयांचा निधी राखून ठेवण्यात आला आहे. स्टार्टअप्सना व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य करण्यासाठी राज्य सरकार संधी देणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सृजन, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभाग, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित डिपेक्स प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर, प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक-अध्यक्ष प्रमोद चौधरी, ‘अभाविप’चे राष्ट्रीय महामंत्री वीरेंद्रसिंह सोळंकी, उद्योजक श्याम वाडकर, उद्योजक भरत अमळकर, प्रसेनजीत फडणवीस उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांनी एका प्रकल्पापुरते मर्यादित न राहता आपल्या कल्पनांमधील त्रुटी शोधून व्यवसायांच्या गरजा ओळखून स्टार्टअप तयार केले पाहिजेत. या स्टार्टअपचे व्यवसायात रूपांतर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार तरुण-तरुणींसोबत आहे. याकरिता सिडबीसोबत राज्य सरकारने करार केला असून, त्या माध्यमातून १०० कोटी रुपयांचा निधी तयार केला आहे.’महाराष्ट्र २०४७ पर्यंत ‘नेट झिरो’कडे

पारंपरिक स्त्रोतातून वीज तयार केल्याने प्रदूषणात वाढ होत आहे. त्यामुळे हरित वायूच्या माध्यमातून कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सन २०३० पर्यंत एकूण ऊर्जेत ५२ टक्के ऊर्जा ही अपारंपरिक स्त्रोतातून तयार करण्याचे उद्दिष्ट असून, सन २०४७ पर्यंत महाराष्ट्र ‘नेट झिरो’कडे वाटचाल करेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस