शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: बहिणीकडे राहायला जातात म्हणून मुलाकडून वडिलांना बुटांनी मारहाण;उपचारादरम्यान मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 11:01 IST

वडिलांच्या मृत्यूनंतर फरार झालेल्या मुलाला नारायणगाव पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक केली आहे.

नारायणगाव - "तुम्ही बहिणीकडे चाकणला राहण्यास का जाता?" या कारणावरून मुलाने वडिलांना बुटांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. उपचारादरम्यान वडिलांचा मृत्यू झाला. ही घटना जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी येथे घडली. वडिलांच्या मृत्यूनंतर फरार झालेल्या मुलाला नारायणगाव पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक केली आहे.गणेश ज्ञानेश्वर खंडागळे (वय ३८, रा. खंडागळे मळा, मांजरवाडी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याने वडील ज्ञानेश्वर नाथा खंडागळे (वय ५५) यांना बुटांनी मारहाण केली होती. या मारहाणीत ज्ञानेश्वर खंडागळे गंभीर जखमी झाले होते. अधिकच्या माहितीनुसार, नारायणगावचे सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश खंडागळे याने "तुम्ही बहिणीकडे चाकणला राहायला का जाता?" असे म्हणत वडिलांना शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर त्यांना खाली पाडून छातीवर, पोटावर आणि डोक्यावर बुटांनी जोरजोरात लाथा मारल्या. गंभीर जखमी असलेल्या ज्ञानेश्वर खंडागळे यांना ससून हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले असता ते उपचारादरम्यान मृत्यूमुखी पडले.या घटनेबाबत १६ जुलै रोजी सायंकाळी ६:५७ वाजता नारायणगाव पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ कलम ११८ (१), ११८ (२), ११५ (२), ३५२, ३५१ (२), ३५१ (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर गुन्ह्यामध्ये बीएनएस कलम १०३ वाढवून फरार झालेल्या गणेश खंडागळे यास पोलिसांनी २४ तासांत अटक केली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

टॅग्स :Pune Crimeपुणे क्राईम बातम्याMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी