शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

सोमेश्वर कारखान्याच्या कामगार भरतीत अनुशेष भरलाच नाही;ऊस उत्पादकांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 13:34 IST

- करंजे येथील ऊस उत्पादकांचा आरोप, कारखानास्थळावर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण

सोमेश्वरनगर : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यातील कामगार भरतीत शासकीय नियमानुसार, अनुशेष न भरल्याचा आरोप करत विविध मागण्यांसाठी करंजे (ता. बारामती) येथील ग्रामस्थ आणि ऊस उत्पादक सभासदांनी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले.या उपोषणात करंजेचे सरपंच भाऊसाहेब हुंबरे, माजी उपसरपंच बुवासाहेब हुंबरे, संताजी गायकवाड, माउली केंजळे, तंटामुक्ती अध्यक्ष सचिन पाटोळे, नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शिंदे, ॲड.बाळासाहेब गायकवाड, प्रताप गायकवाड, सुनील मोकाशी, नंदकुमार मोकाशी, अनिल हुंबरे, माजी उपप्राचार्य एस.एस. गायकवाड, प्रकाश हुंबरे, प्रशांत जाधव, प्रसाद सोनवणे यांच्यासह अनेक ग्रामस्थ सहभागी झाले.

उपोषणकर्त्यांनी सोमेश्वर कारखान्यातील कामगार भरतीत शासकीय नियमानुसार, अनुशेष न भरल्याचा आरोप केला. यामुळे परिसरातील अनेक कुटुंब रोजगारापासून वंचित राहिल्याचे त्यांनी सांगितले. करंजे गावातील युवकांना कारखान्यात नोकरी न देण्याचा आणि काही घरांतील अनेक व्यक्तींना नोकरीवर ठेवण्याचा भेदभाव केल्याचा आरोपही उपोषणकर्त्यांनी केला. याशिवाय, सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाकडून करंजे भागशाळेला सातत्याने सापत्न वागणूक मिळत असल्याचा आरोप करण्यात आला.

२०१४ मध्ये ४७२ विद्यार्थ्यांचा पट असलेली ही शाळा २०२५ मध्ये २२० विद्यार्थ्यांवर आली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचा दावा करत, समर्पित शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी माजी उपप्राचार्य एस.एस. गायकवाड यांनी केली. 

संचालकांवर अवमानाचा आरोपकरंजेचे लोकनियुक्त सरपंच भाऊसाहेब हुंबरे यांच्यासोबत शिक्षण संस्थेच्या कार्यालयात झालेल्या चर्चेदरम्यान संचालक आनंदराव होळकर यांनी करंजे गावाबद्दल अवमानकारक शब्द वापरल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला. याबाबत उपोषणकर्त्यांनी जाहीर निषेध व्यक्त केला, तसेच कारखाना प्रशासनाने आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप करत, सरपंच भाऊसाहेब हुंबरे यांनी प्रशासनाविरोधात अनुसूचित जाती-जमाती कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची घोषणा केली.

 कारखाना प्रशासनाची भूमिका

सोमेश्वर कारखाना प्रशासनाने वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या करंजेपूल चौकीला पत्र देऊन, उपोषणकर्ते भाऊसाहेब हुंबरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मागण्यांवर संचालक मंडळाच्या सभेत चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, उपोषणस्थळाकडे कारखाना संचालक मंडळ आणि प्रशासनाने पाठ फिरविल्याने उपोषणकर्त्यांनी संताप व्यक्त करत प्रशासनाचा निषेध केला.

उपोषणाला पाठिंबाया उपोषणाला करंजेपूलचे माजी सरपंच वैभव गायकवाड, मुरुमचे उपसरपंच सोमनाथ सोनवणे यांच्यासह अनेकांनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शविला.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड