शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

‘डेअरिंग’दाखवत जिगरबाज अनिताने हाती घेतले रुग्णवाहिकेचे ‘स्टेअरिंग’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 16:37 IST

- उद्योगनगरीतील पहिल्या महिला रुग्णवाहिका चालक

- रवींद्र जगधने 

पिंपरी : शिक्षण फक्त चौथी पास, पण रुग्णवाहिका चालवण्यातील सफाई वाखाणण्यासारखी. त्यामुळेच महाराष्ट्रातील पहिल्या महिला रुग्णवाहिका चालकांपैकी एक अशी ओळख मिळाली. कोरोनाच्या काळात वाहनचालकांनी घरात बसणे पसंत केले असताना, या जिगरबाज रणरागिणीने कोरोनाचे रुग्ण आणि मृतदेहही स्वत: उचलून रुग्णवाहिकेत ठेवले आणि त्या-त्या ठिकाणी पोहोचवलेही..! अनिता संजय गोसावी (वय ४६) यांची ही कहाणी.

वाल्हेकरवाडी येथे राहणाऱ्या अनिता आता आजीबाई झाल्या आहेत, कारण मुलगा-मुलगी विवाहित असून नातवंडेही झाली आहेत. आई-वडील, भाऊ-बहीण यांच्यासोबत त्या राहतात. मूळगाव अकलूजहून २००८ मध्ये त्या कुटुंबासह पुण्यात आल्या. आधी स्कूल बसवर मदतनीस म्हणून काम केले होते, त्यामुळे वाहन चालवण्याची आवड निर्माण झाली. त्यातूनच त्या २०१७ मध्ये ड्रायव्हिंग शिकल्या. सरावासाठी जुना टेम्पो घेतला. त्यासाठी सोने मोडले. त्या टेम्पोतून अनिता आईच्या भाजी दुकानासाठी मार्केट यार्डमधून भाजी आणत. यादरम्यान २०१५ मध्ये पतीला अर्धांगवायू झाला आणि २०२३ मध्ये त्यांचे निधन झाले.

भावाची रुग्णवाहिका होती. २०१९ मध्ये भावाला कोरोना झाल्याने तो क्वारंटाइन झाला. तेव्हा अनिताताईंनी रुग्णवाहिकेचे स्टेअरिंग हाती घेतले. कोरोनाचा पहिला रुग्ण सोडताना मनात धास्ती होती, पण पीपीई किटमुळे धाडस आले. मग त्यांनी मागे वळून पाहिले नाही. कोरोना रुग्णांना रुग्णालयापर्यंत आणि मृतदेह स्मशानभूमीपर्यंत पोहोचवले. एका रुग्णाला तर १,१०० किलोमीटरचा प्रवास करून गुजरातपर्यंत पोहोचवले होते.  धाडस, मेहनत आणि मानवतेच्या भावनेने अनिता यांनी अनेकांचे जीवन वाचवले आहे आणि मृतदेहांना सन्मानाने निरोप दिला आहे.

जखमी रुग्ण, कुजलेले मृतदेहांना दिला हात

ताईंनी जुनी मारुती व्हॅन विकत घेऊन रुग्णवाहिका बनवली. सुरुवातीला वायसीएम रुग्णालयाजवळ महिनाभर रुग्णवाहिका उभीच होती. त्यानंतर अनुभवी चालकांच्या सल्ल्याने रुग्णालय, ‘डेड हाऊस’ परिसरात फिरून माहिती दिली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पहिला मृतदेह भोसरी स्मशानभूमीत पोहोचवला. त्यानंतर त्यांनी सलग दीड महिने दिवसरात्र सेवा दिली. घरच्यांच्या काळजीमुळे केवळ दोन-चार दिवस घरी थांबल्या. आता त्या अपघातातील जखमी, कुजलेले मृतदेह स्वत: उचलून घेऊन जातात. रात्री-अपरात्री काम असते. बेवारस मृतदेहांसाठी मोफत सेवा देतात.

बहिणीनेही पावलावर ठेवले पाऊल

लांबच्या प्रवासात अनिता छोटी बहीण वनिता गिरी यांना सोबत घेऊन जात असत. त्याही २०२३ पासून रुग्णवाहिका चालवतात. त्यांच्या पतीचे अपघातात निधन झाले असून रुग्णवाहिका चालवूनच कुटुंबाचे पालनपोषण करत आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Anita's Courage: Fourth-Grade Graduate Drives Ambulance, Saves Lives During Pandemic.

Web Summary : Anita Gosavi, a fourth-grade graduate, became a lifesaver by driving an ambulance during the pandemic. She transported COVID patients and deceased, showing immense courage. Now, she transports accident victims and provides free service for unclaimed bodies, inspiring her sister to follow suit.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेWomenमहिला