शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाख मोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
3
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
4
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
5
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
6
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
7
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
8
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
11
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
12
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
13
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
14
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
15
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
16
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
17
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
18
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
19
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
20
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शरद पवार गट मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 09:43 IST

बारामतीमधील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत कोलते बोलत होते. त्यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे.

बारामती : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शरद पवार गटाने मैदानात उतरायचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात महाविकास आघाडी लढवेल, तर बारामती आणि माळेगावमध्ये स्थानिक विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवली जाणार आहेत. मात्र भाजपच्या विरोधात आमची निवडणूक लढविणार असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटासोबत आमची युती होण्याची शक्यता नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय कोलते यांनी स्पष्ट केले.

बारामतीमधील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत कोलते बोलत होते. त्यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यात जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांची भूमिका आणि मते जाणून घेतली जात आहेत. नुकत्याच खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे येथे इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, राजगड, मुळशी, दौंड आणि हवेली अशा आठ तालुक्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली.

या बैठकीत पुणे जिल्ह्यात, विशेषतः बारामती लोकसभा मतदारसंघात, महाविकास आघाडीच्यावतीने काँग्रेस, उद्धवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एकत्र येऊन निवडणुका लढविणार आहेत, असे ठरले. मात्र, नगरपालिकांच्या पातळीवर पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढविण्यात काही ठिकाणी अडचणी आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाविरुद्ध समविचारी स्थानिक पक्षांची आघाडी करून निवडणुका लढतल्या जाणार आहेत आणि या निवडणुकांसाठी पक्षाच्या चिन्हाचा आग्रह धरला जाणार नाही, अशी भूमिका आहे.  माळेगाव कारखाना निवडणुकीसाठी ज्यांच्याशी युती करण्याचा प्रयत्न केला होता, त्यांनी योग्य वेळी निर्णय न दिल्याने आम्हाला फसवणूक झाली. त्यामुळे आता स्वतंत्रपणे बारामती नगरपरिषद आणि माळेगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी स्वतंत्रपणे आघाडीमार्फत जाण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा माळेगाव कारखाना निवडणुकीत पूर्वीप्रमाणे तयारी नव्हती, मात्र यावेळी सावधगिरीने निवडणुका लढविणार आहोत, असे कोलते म्हणाले.

अजित पवारांबरोबर युती नाहीबारामतीतील बैठकीत खासदार सुप्रिया सुळे, युवा नेते युगेंद्र पवार उपस्थित होते. यामध्ये माळेगावला माळेगाव विकास आघाडी करणार आहे. इतरांबाबत माहिती नाही, मात्र, अजित पवार गटाबरोबर आमची युती होण्याची शक्यता नाही. मात्र, चुकुन त्यांच्या गटाचे काही लोक आल्यास ते आमच्या स्थानिक विकास आघाडीत सहभागी होवू शकतात. चिन्हाचा विचार करता घड्याळाबरोबर आमची युती नाही नसल्याचे विजय कोलते यांनी स्पष्ट केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Sharad Pawar Group to Contest Local Body Elections Independently.

Web Summary : Sharad Pawar's group will contest local elections, potentially with Maha Vikas Aghadi in districts. Baramati and Malegaon will see local alliances, opposing BJP. No alliance with Ajit Pawar's faction is expected.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रElectionनिवडणूक 2024