पुणे : सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा आणि मावळा फौंडेशनने या संमेलनाचे आयोजन केले आहे अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.
साहित्य महामंडळाची बैठक पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेत रविवारी, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला उपाध्यक्ष गुरय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, मराठवाडा साहित्य परिषदेचे डॉ. दादा गोरे, रामचंद्र काळून्खे, देविदास फुलारी, मुंबई मराठी साहित्य संघाच्या प्रा. उषा तांबे, प्रकाश पागे, विदर्भ साहित्य संघाचे प्रदीप दाते, विलास मानेकर, मराठी साहित्य परिषद, तेलंगणाच्या डॉ. विद्या देवधर, छत्तीसगड मराठी साहित्य संघाचे कपूर वासनिक, मध्य प्रदेश मराठी साहित्य संघाचे पुरुषोत्तम सप्रे, मराठी वाड्मय परिषद, बडोदाचे संजय बच्छाव, गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे रमेश वंसकर हे घटक, समाविष्ट आणि संलग्न संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर प्रकृतीच्या कारणास्तव उपस्थित राहू शकल्या नाहीत. प्रा. जोशी म्हणाले, ‘घटक संस्थांनी तसेच महामंडळातील सर्व समाविष्ट, संलग्न संस्थांनी विश्वास पाटील यांचे नाव अध्यक्षपदासाठी अग्रक्रमाने सुचविले होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेने संमेलनाचे आयोजन केले असल्याने पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने कोणाचेही नाव अध्यक्षपदासाठी सुचविले नाही. संस्थांकडून शिफारस करण्यात आलेल्या नावातून मराठी साहित्याचे दालन समृद्ध करण्यासाठी दिलेले योगदान विचारात घेऊन विश्वास पाटील यांची सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. सभेत मतदान घेण्याची वेळ आली नाही. अध्यक्षांनाही त्यांचे मत नोंदवावे लागले नाही. शनिवारी मार्गदर्शन समितीने संयोजकांसमवेत ठरविलेल्या कार्यक्रमाच्या आराखड्यास साहित्य महामंडळाच्या या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. हे संमेलन ४ दिवस होणार असून १,२,३ आणि ४ जानेवारी २०२६ रोजी साताऱ्यातील शाहू स्टेडीअम येथे होणार आहे.
गेली चाळीस वर्षे साहित्याची अखंडपणे सेवा करीत आहे. रसिक आणि साहित्य महामंडळाची पसंतीची पावती मिळाली याचे समाधान आणि खूप आनंद आहे - 'पानिपत'कार विश्वास पाटील
साहित्य संमेलनाध्यक्ष पानितकर विश्वास पाटील यांचा परिचय विश्वास शांताराम पाटील, १९९२ सालच्या मुख्य साहित्य अकादमी पुरस्काराचे विजेते. मराठीतील प्रख्यात कादंबरीकार व नाटककार आहेत. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील ‘नेर्ले’ नावाच्या छोट्याशा खेड्यात शेतकरी कुटुंबात झाला.
----------
महत्त्वाचे सन्मान व पुरस्कार :फेब्रुवारी २०२० मध्ये विश्वास पाटील यांना त्यांच्या साहित्य योगदानासाठी विशेषत: ‘झाडाझडती’ (A Dirge for Dammed) आणि ‘नागकेशर’ या कादंबऱ्यांसाठी इंदिरा गोस्वामी साहित्य राष्ट्रीय पुरस्कार (आसाम) प्राप्त झाला. यापूर्वी हा मान महाश्वेता देवी आणि भैरप्पा यांसारख्या नामवंत लेखकांना मिळाला होता.
--------------पुरस्कार :
१९८९: नाथमाधव पुरस्कार (पानिपत)१९९० : प्रियांदर्शनी राष्ट्रीय पुरस्कार (पानिपत)१९९२ : साहित्य अकादमी पुरस्कार (झाडाझडती),
१९९३ : राज्य शासन सर्वोत्तम कादंबरी पुरस्कार (पांगिरा)१९९९ : राज्य शासन सर्वोत्तम कादंबरी पुरस्कार (महानायक)
२००० : जयवंत दळवी पुरस्कार
-----------
(नाट्य लेखन : रणांगण)२००० : सर्वोत्कृष्ट नाटक शासन पुरस्कार ‘पानिपतची रणांगण’२००५ : महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, सर्वोत्कृष्ट कादंबरी पुरस्कार (चंद्रमुखी)
२००९ : राज्य शासन चित्रपट समीक्षण पुरस्कार (नॉट गॉन विथ द विंड)२०११ : लाभोसेटवार पुरस्कार (अमेरिका) एक लाख रुपये, सर्वोत्तम मराठी लेखक म्हणून
२०१६ : लोकमंगल सर्वोत्तम कादंबरी पुरस्कार (लस्ट फॉर लालबाग)
-------------
विश्वास पाटील यांची ग्रंथसंपदा :१. गाभूळलेल्या चंद्रबनात.
२. नागकेसर३. पानिपत
४. पांगिरा५. झाडाझडती
६. चंद्रमुखी७. लस्ट फॉर लालबाग :
८. संभाजी९. क्रांतिसूर्य
१०. महानायक११. आंबी :
१२. महासम्राट
१३. महासम्राट खंड दुसरा१४. दुडिया
१५. पानिपतचे रणांगण१६. नॉट गॉन विथ द विंड
१७. बंदा रुपाया१८. अण्णा भाऊंची दर्दभरी दास्तान
१९. दी ग्रेट कांचना सर्कस