शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेचा हलगर्जीपणा;‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेतली असती तर रंजना गिरींचे प्राण वाचले असते

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 11:05 IST

- महिनाभरापूर्वीच दिला होता शहरात ४४ हजार ५०० धोकादायक झाडे असल्याचा इशारा - प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच आणखी एका महिलेला गमवावा लागला जीव

पुणे : शहरातील ५८ लाख ५६१ झाडांपैकी तब्बल ४४ हजार ५०० झाडे धोकादायक असून, पाच वर्षांत झाडपडीमुळे किती नागरिकांचा मृत्यू झाला. यांसह नशीब बलवत्तर असल्याने फर्ग्युसन रस्त्यावर महाविद्यालयीन तरुणींचे प्राण वाचले, यासंबंधीचे सविस्तर वृत्त ‘लोकमत’ने ५ मार्च रोजी दिले होते. या वृत्ताची दखल घेऊन महापालिका प्रशासनाने शहरातील धोकादायक झाडे आणि धोकादायक फांद्यांचा योग्य बंदोबस्त केला असता तर सिंहगड रस्त्यावरील फुलविक्रेत्या रंजना नवनाथ गिरी यांचे प्राण वाचले असते. त्यामुळे आतातरी महापालिका प्रशासन जागे होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

महापालिका हद्दीत ५८ लाख ५६१ झाडे आहेत. शहराची नैसर्गिक रचना बशीसारखी असल्याने आणि शहराच्या आसपास डोंगरी भाग असल्याने शहराच्या लोकसंख्येएवढी झाडांची संख्या आहे. मात्र, शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामे आणि खोदाईच्या कामांमुळे एकूण झाडांच्या संख्येपैकी ४४ हजार ५०० झाडे धोकादायक आहेत. यामुळे पावसाळा आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे आाणि फांद्या कोसळण्याचे प्रमाण वाढत आहे. यामुळे अनेकदा अपघात घडून नागरिकांचा बळी जात असल्याचे चित्र आहे. मागील ५ वर्षांच्या आकडेवारीवरून शहरातील धोकादायक झाडांमुळे ६८ नागरिकांचे बळी गेले असून, अनेकजण जखमी झाले आहेत.

मागील महिन्यात फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर पाच ते सहा महाविद्यालयीन मुली झाडाच्या सावलीखाली गप्प मारत फुटपाथवर थांबल्या होत्या, त्यावेळी येथील झाडाची फांदी त्यांच्या जवळ कोसळली. या अपघातामध्ये महाविद्यालयीन तरुणी नशीब बलवत्तर होते म्हणून वाचल्या. यासंबंधीचे वृत्त ‘लोकमत’ने ५ मार्च रोजी प्रसिद्ध केले होते. या वृत्तामध्ये शहरातील धोकादायक झाडांचा लेखाजोखा मांडण्यासह महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण व संवर्धन समितीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेऊन महापालिका प्रशासनाने शहरातील धोकादायक झाडे व धोकादायक फांद्या तोडून टाकणे गरजेचे होते. मात्र, प्रशासनाने या वृत्ताची दखल घेतली नाही, प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच आणखी एका महिलेला जीव गमवावा लागला आहे.

वादळी पावसात कोसळली दोनशे ते अडीचशे झाडे

शहर व परिसरात सोमवार, बुधवार आणि गुरुवारी झालेल्या वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे दोनशे ते अडीचशे झाडे कोसळली. यामध्ये गुरुवारी दुपारी झालेल्या पावसात सिंहगड रस्त्यावरील नवशा मारुती तेथे झाड कोसळून फुलविक्रेत्या रंजना गिरी यांचा मृत्यू झाला. महापालिकेने रंजना गिरी यांच्या कुटुंबाला पाच लाखाची नुकसानभरपाई जाहीर केली. मात्र, वेळीच महापालिकेने शहरातील धोकादायक झाडे आणि धोकादायक फांद्यांचा बंदोबस्त केला असता, तर रंजना गिरी यांचे प्राण वाचले असते. त्यामुळे आता तरी महापालिका प्रशासन जागे होऊन कायमस्वरूपी उपाययोजना करणार का, हा प्रश्न कायम आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Lokmat report ignored; Ranjana Giri's life could have been saved.

Web Summary : Negligence cost a life. Despite prior warnings in Lokmat about dangerous trees, authorities failed to act. A flower vendor died after a tree fell. Action needed.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र