शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

महादेवी हत्तिणीबाबत राजू शेट्टी यांची भूमिका दुटप्पी; निवृत्त पोलिस अधिकारी आंधळकर यांनी केले गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 21:09 IST

शेट्टी त्या हत्तिणीसाठी कोल्हापूरकरांच्या भावना ओळखून वेगळेच बोलत आहेत, असे भाऊसाहेब आंधळकर यांनी सांगितले.

पुणे : कोल्हापुरातील महादेवी हत्तिणीबाबत जे काही सुरू आहे, त्यात राजू शेट्टी दुटप्पीपणे वागत असल्याची टीका निवृत्त पोलिस अधिकारी भाऊसाहेब आंधळकर यांनी केली. त्यांनी २०१८ मध्ये पाठवलेल्या एका पत्रामुळेच हा वाद उद्भवला असल्याचा आरोप आंधळकर यांनी पत्रकार परिषदेत केला. हत्तिणीबाबत कोल्हापूरकरांच्या भावनांचा राजकारणासाठी वापर केला जात आहे, असे ते म्हणाले.

आंधळकर यांनी पुण्यात बुधवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी राजू शेट्टी यांना लक्ष्य केले. त्यांनीच सन २०१८ मध्ये वनविभागाला पत्र लिहून हत्तिणीला सांभाळण्याची कसलीही व्यवस्था नसल्याचे म्हटले होते. त्यानंतरच पेटासारख्या संघटनांचे या विषयाकडे लक्ष गेले. २०१८ मधील पेटा संघटनेच्या प्रतिनिधींबरोबरचे शेट्टी यांचे छायाचित्रही आता सार्वजनिक झाले आहे. आता शेट्टी त्या हत्तिणीसाठी कोल्हापूरकरांच्या भावना ओळखून वेगळेच बोलत आहेत, असे आंधळकर यांनी सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालय बंद असतानाही त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्यांच्या अंगात हत्तिणीचे छायाचित्र असलेला बनियन होता, बाकी कोणाच्या अंगावर मात्र असला बनियन नव्हता. यावरून ते हे सगळे काही राजकारणातील स्वत:ची विस्मरणात गेलेली प्रतिमा पुन्हा आणण्यासाठी करत असल्याची टीका आंधळकर यांनी केली. कोल्हापूरकरांच्या भावनाच इतक्या तीव्र आहेत की महादेवी हत्तीण पुन्हा कोल्हापूरला येणारच आहे, मात्र त्याच्याशी शेट्टी यांचा काहीच संबंध नसेल, असे  आंधळकर म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRaju Shettyराजू शेट्टी