शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण पण क्रॉस व्होटिंग कुणाचा खेळ बिघडवणार?
2
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
3
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
4
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; गोळीबारात आतापर्यंत ९ मृत्यू ८० जखमी
5
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
6
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी
7
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
8
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ४ ग्रहांचे गोचर ७ राशींना लाभ; धनलाभाची पुरेपूर संधी, नशिबाचीही साथ
9
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी
10
जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार
11
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
12
पूरग्रस्त भागात गेलेल्या काँग्रेस खासदाराला ग्रामस्थांनी खांद्यावर घेतलं, भाजपाने Video वरुन घेरलं
13
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
14
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
15
सरकारे उलथवून टाकण्यात तरुणाई सर्वात पुढे; आतापर्यंत 'या' देशांमध्ये झाले सत्तापालट
16
पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली ५ मुलांची आई, लग्न केलं पण...; गावात रंगला हाय वोल्टेज ड्रामा!
17
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
18
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
19
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
20
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला

राजगुरुनगर सहकारी बँकेच्या वार्षिक सभेला गालबोट; नेमकं काय घडलं ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 18:09 IST

या सभेत एक सभासद तरुण मद्यप्राशन करून आला होता. मंदधुंद अवस्थेत हा तरुण संचालकांना प्रश्न विचारत होता.

राजगुरूनगर : पुणे जिल्ह्यात सहकार क्षेत्रातील अग्रणी असलेल्या राजगुरुनगर सहकारी बँकेची ९४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार (दि. ७) रोजी पार पडली. यावेळी सर्वात पहिले प्रश्न विचारण्यावरून दोन सभासदांमध्ये शिवीगाळ व हाणामारी झाल्याने वार्षिक सभेला पहिल्यांदाच गालबोट लागले.अधिकच्या माहितीनुसार, राजगुरुनगर सहकारी बँकेची वार्षिक सभा चंद्रमा गार्डन येथे पार पडली. या सभेत एक सभासद तरुण मद्यप्राशन करून आला होता. मंदधुंद अवस्थेत हा तरुण संचालकांना प्रश्न विचारत होता. संचालक मंडळही समर्पक उत्तरे देत होते. मात्र पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारण्यासाठी हातात माईक घेण्यावरून दोन सभासदांमध्ये बाचाबाची होऊन शिवीगाळ व हाणामारी झाली. माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल बाबा राक्षे, हिरामण सातकर, रेवणनाथ थिगळे व सभासदांनी या व्यक्तीला सभागृहाबाहेर काढले.दरम्यान, अध्यक्षीय भाषणात सागर पाटोळे म्हणाले, “राजगुरुनगर सहकारी बँकेने त्यांच्या ग्राहकांसाठी इंटरनेट बँकिंग सुविधा सुरू केल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांची बँक म्हणून बँकेची ओळख सर्वत्र आहे. ग्राहक-सभासद यांच्या हिताचे निर्णय घेऊन आणि आरबीआयचे निर्बंध यांचे काटेकोर पालन केल्याने सहकार क्षेत्रात भरारी घेऊन अनेक पुरस्कार बँकेने मिळवले आहेत.”

या सभेला बँकेचे अध्यक्ष सागर पाटोळे यांच्यासह उपाध्यक्ष अश्विनी पाचारणे, ज्येष्ठ संचालक किरण आहेर, विजया शिंदे, राजेंद्र सांडभोर, राजेंद्र वाळुंज, गणेश थिगळे, अरुण थिगळे, दिनेश ओसवाल, अॅड. राहुल तांबे, विनायक घुमटकर, विजय डोळस, अविनाश कहाणे, रामदास धनवटे, दत्तात्रय भेगडे, समीर आहेर, सचिन मांजरे, तज्ञ संचालक अॅड. धर्मेंद्र खांडरे, गौतम कोतवाल, सुरेश कौदरे, प्रकाश डोळस, विकास बाणखेले, दीपक वारुळे, महेश शेवकरी, मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम वाकचौरे, वरिष्ठ अधिकारी संजय ससाणे, अमृत टाकळकर, सम्राट सुपेकर, अंकुश कोहिणकर, दिलीप मलघे, बाळासाहेब घोलप, मंजित महिंद्रकर यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.यावेळी बँकेचे माजी अध्यक्ष दिनेश ओसवाल ह्यांची पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन वर संचालक पदी निवड झाल्याबद्दल तसेच २०२४- २५ ह्या आर्थिक वर्षात महाराष्ट्र अर्बन को ऑपरेटिव बँक्स फेडरेशन चा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळवून दिल्याबद्दल बँकेचे सभासद बाबा राक्षे,हिरामण सातकर ह्यांनी विशेष सत्कार वार्षिक सर्वसाधारण सभेत केला.सभासदांच्या वतीने शांताराम घुमटकर, हिरामण सातकर, बाबा राक्षे, अॅड. महादेव घुले, अशोक दुगड, प्रकाश पाचारणे, रेवण थिगळे, शरद मुऱ्हे, कालिदास सातकर, सुरेश टाकळकर, विलास मांजरे, शिवाजी वर्पे, अॅड. वैभव कर्वे, सुधीर वाळुंज, अनिल वरकड आदींनी प्रश्न विचारले. त्यांच्या प्रश्नांना बँकेचे अध्यक्ष सागर पाटोळे, संचालक किरण आहेर, दिनेश ओसवाल आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम वाकचौरे यांनी उत्तरे देऊन निरसन केले. ९४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आलेले सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम वाकचौरे यांनी बँकेच्या अहवालाचे वाचन केले. आभार बँकेचे उपाध्यक्ष अश्विनी पाचारणे यांनी मानले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड