शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील वनपर्यटनाचा आराखडा करा, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 11:50 IST

- पर्यावरणपूरक पद्धतीने पर्यटकांसाठी सुविधा निर्माण करण्याचे निर्देश

पुणे : जिल्ह्यात वनक्षेत्रातील पर्यटनस्थळांचा सर्वांगीण विकास केल्यास पर्यटनाला मोठी चालना मिळेल. त्यादृष्टीने वन विभागांतर्गत राजगड तसेच अन्य किल्ले, जुन्नर वन विभागांतर्गत विविध घाट, धबधबे, डोंगर आदींच्या ठिकाणी पर्यटकांसाठी विविध सुविधा पर्यावरणपूरक पद्धतीने विकसित करण्याबाबत आराखडा सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत वनपर्यटन विकासासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते, जुन्नर वन विभागाचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, सहायक वनसंरक्षक (वन्यजीव) जयश्री पवार, पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वाहणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई आदी उपस्थित होते.

राजगड पायथा येथे वन विभागाच्या कार्यक्षेत्रात विविध सुविधा निर्माण करण्यात याव्यात. त्या निर्माण करताना वन विभागाचे नियम, मानके लक्षात घ्याव्यात. स्थानिक दगड, माती, लाकूड आदींचा वापर करून पर्यावरणपूरक विकास करावयाचा आहे. सिमेंट काँक्रिट किंवा अन्य बाबींचा वापर करण्यात येणार नाही. पर्यटक अधिकाधिक भेटी देतात अशी ठिकाणे निश्चित करून त्या ठिकाणी दगडी बाकडे, शौचालये, आवश्यक त्या ठिकाणी दगडी पायऱ्यांचा वापर करून लहान रस्ते, लाकडी बॅरिकेडिंग, रेलिंग आदी करावे. संबंधित ठिकाणांची महत्त्वाची माहिती पर्यटकांना मिळावी यासाठी सायनेजेस तयार करावेत, अशाही सूचना त्यांनी दिल्या.

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या कार्यक्षेत्रात करावयाच्या कामांसाठी संबंधित विभागाची ना-हरकत घ्यावी. राजगड किल्ला युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झाल्यामुळे येथे विविध सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य सरकारकडूनही मोठ्या प्रमाणात निधी मिळू शकेल, असेही ते म्हणाले. या विविध ठिकाणी निर्माण करावयाच्या सुविधांच्या अनुषंगाने सल्लागार संस्थेच्यावतीने यावेळी सादरीकरण करण्यात आले. उपवनसंरक्षक प्रशांत खाडे यांनी नानेघाट, दाऱ्याघाट, आंबोली, कांचन, काळू, धूरनळी धबधबे, दुर्गवाडी कोकणकडा, भिवेगाव खेड कुंड, कुंडेश्वर निसर्ग पर्यटन, शिंगेश्वर मंदिर टेकडी, भामचंद्र डोंगर, तुकाई माता मंदिर, अरण्येश्वर मंदिर, शिरूर ऑक्सिजन पार्क या ठिकाणी करावयाच्या पर्यटक सुविधांसाठीचा आराखडा सादर केला. यावेळी इको टूरिझम क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या प्रतिनिधींनी विविध सूचना केल्या. या सूचनांचा समावेश पर्यटन स्थळांचा विकास करताना केला जाईल, असे डुडी म्हणाले.

 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड