शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
2
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
3
भयंकर! हिट अँड रननंतर कारने बाईकस्वाराला १.५ किमी फरफटतं नेलं; धडकी भरवणारा Video
4
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
5
'साईबाबा' फेम अभिनेते सुधीर दळवींना मदत केल्याने रणबीर कपूरची बहीण झाली ट्रोल, नेमकं काय घडलं?
6
"खरं सांगायचं तर..."; फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतल्याच्या आरोपांवर अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला
7
पती झाला हैवान! लेकासमोरच पत्नीची निर्घृण हत्या, डोळ्यांना, चेहऱ्याला...; अपघाताचा रचला बनाव
8
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
9
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
10
वेतन वाढेल, जबाबदारी? आठव्या वेतन आयोगाने सरकारवरील बोजा २० ते २५ हजार कोटींनी वाढणार
11
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
12
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
13
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
14
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
15
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
16
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
17
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
18
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
19
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
20
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे

प्रवाशांची निराशा झाली; पुण्याहून नवीन विमानसेवा नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 13:21 IST

मागणी असूनदेखील स्लॉट वाढवून न मिळाल्याने प्रवाशांच्या पदरी निराशा 

पुणे : लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळाचा हिवाळी हंगाम सुरू झाला आहे; परंतु या हंगामात नवीन एकाही शहराला विमान उड्डाणे जोडले गेले नाही. नवीन टर्मिनल सुरू झाल्यावर विमान प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे विमान उड्डाणांची संख्या वाढवून मिळण्याची मागणी असूनदेखील स्लॉट वाढवून मिळाले नाहीत. त्यामुळे विमान प्रवाशांची निराशा झाली आहे.

लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावरूनपुणे आणि उन्हाळी हंगाम २५ ऑक्टोबरला संपला. त्यानंतर दि. २६ पासून हिवाळी हंगाम सुरू झाला आहे. हवाई दलाकडून उन्हाळी हंगामासाठी पुणे विमानतळाला जवळपास २२० स्लॉट देण्यात आले होते. परंतु यातील २०८ स्लॉटचा वापर उन्हाळी हंगामात करण्यात आला. तर, १२ स्लॉट रिकामे होते. या काळात पुणे विमानतळावरून साधारण ३० ते ३२ हजार प्रवासी दररोज प्रवास करत होते.पुणे हे लष्कराचे विमानतळ असल्यामुळे सकाळी नऊ ते साडेअकरादरम्यान ते बंद असते. त्यामुळे दिवसा स्लॉटची संख्या कमी असते. तर रात्री प्रवासी वाहतुकीसाठी स्लॉट जास्त असतात. त्यामुळे पुण्यातून सुटणारी आणि येणाऱ्या विमानांची संख्या रात्री जास्त असते; पण नवीन १५ स्लॉट हे दिवसाचे होते. त्यामुळे त्या स्लॉटचा वापर करून वेगवेगळ्या शहरांसोबत हवाई वाहतूक जोडण्यासाठी त्याचा वापर होणे अपेक्षित होते. हिवाळी हंगामात नवीन शहरे आणि मागणी असलेल्या ठिकाणी विमान सेवा वाढविण्यासाठी त्याचा वापर होणे अपेक्षित होते. पण हिवाळी हंगाम सुरू झाला असला तरी पुण्यातून या हंगामात नवीन शहरांसाठी विमान सेवा वाढल्याचे दिसून आलेले नाही. याबाबत पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

केवळ ३५ शहारांसोबत थेट कनेक्टिव्हिटी...

पुणे विमानतळाचा हिवाळी हंगाम २६ ऑक्टोबरपासून सुरू झाला असून, उन्हाळी हंगामात पुण्यातून ३५ शहरांसाठी विमान सेवा सुरू होते. त्यामध्ये दिल्लीसाठी सर्वाधिक विमान सेवा आहे. तर, दुबई, बँकॉक, पुण्यातून आंतरराष्ट्रीय सेवा सुरू आहेत. नव्याने सध्या तरी एकही आंतरराष्ट्रीय सेवा वाढलेली नाही. पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे विमानांचे स्लॉट वाढवून देण्याची मागणी केली जात होती. त्यासाठी केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रयत्न करून हवाई दलाकडून १५ स्लॉट वाढवून घेतले. परंतु त्याचा वापर करण्यात आले नाही.अशी आकडेवारी :

मिळालेली स्लॉट : २२०

वापरण्यात आलेले स्लाॅट : २०८

शिल्लक स्लाॅट : १२

दैनंदिन प्रवासी संख्या : ३० ते ३२ हजार  

पुणे विमानतळाच्या हिवाळी वेळापत्रकात देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय उड्डाणांची संख्या वाढून अनेक नवीन शहरदेखील विमानसेवेने जोडली जातील, ही पुणेकरांची मोठी आशा होती. सिंगापूर, अबुधाबीसारख्या आंतरराष्ट्रीय शहरांबरोबरच मुंबई, नाशिक, बेळगाव, सोलापूर व भारतात अनेक ठिकाणी अलीकडेच सुरू झालेल्या विमानतळांवरून पुणे हवाई सेवेने जोडण्यासाठी मोठी मागणी आहे. यामुळे नवीन शहरांना जोडण्यासाठी तसेच मागणी असलेल्या शहरांना अधिक उड्डाण सुरू करण्यासाठी प्रयत्न करावयास हवेत.  - धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ज्ञ  

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Airport: No new flights disappoint passengers this winter season.

Web Summary : Passengers are disappointed as Pune airport adds no new flight routes this winter, despite increased passenger numbers and demand. Newly acquired slots remain unused, limiting connectivity to 35 cities. Experts urge expansion to meet growing travel needs.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेAirportविमानतळ