शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

पुण्यात शाळेबाहेर मिळतेय ड्रग्जवाली 'चॉकलेट'; विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात

By नम्रता फडणीस | Updated: August 1, 2025 10:40 IST

- शाळांमधील नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसह आता चौथी ते सातवी इयत्तेतील विद्यार्थ्यांमध्येही अमली पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण वाढत असून, 'चॉकलेट' च्या माध्यमातून अमली पदार्थ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

पुणे : हडपसरच्या एका शाळेतील सहावी इयत्तेत शिकणाऱ्या मुलाला अमली पदार्थांचे व्यसन जडले. शाळेला नेहमी दांडी मारायची अन् व्यसन करायचे. त्यासाठी त्याने घरातील भांडी देखील विकली. आईने पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने रात्रीच झोपेत आईचा गळा दाबला. त्याला तू असे का केलेस, असे विचारले असता त्याला काहीच आठवत नव्हते. अमली पदार्थाच्या विळख्यात अडकलेल्या एका शाळकरी मुलाचे हे उदाहरण मती गुंग करणारे आहे ! शाळांमधील नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसह आता चौथी ते सातवी इयत्तेतील विद्यार्थ्यांमध्येही अमली पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण वाढत असून, 'चॉकलेट' च्या माध्यमातून अमली पदार्थ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात केवळ तरुणाईच नव्हे तर शालेय विद्यार्थीदेखील ड्रग्जच्या विळख्यात अडकली आहेत. शालेय विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण २० टक्क्यांपर्यंत पोहोचले असून, विद्यार्थ्यांमधील वाढती व्यसनाधीनता ही समाजासह पालकांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे. याविषयी भोई प्रतिष्ठान अमली पदार्थविरोधी अभियानाचे समुपदेशक डॉ. मिलिंद भोई यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, सध्या मुलांना नशेकडे आकर्षित करण्यासाठी अनोळखी ‘चॉकलेट’ बनवून त्याची विक्री केली जात आहे. शाळेच्या आसपासच्या परिसरातील खाऊच्या दुकानात ही चॉकलेट सरार्सपणे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मात्र, दुकानदारांना आपण काय विकतोय याचीच माहिती नाही. या 'चॉकलेट' मध्ये थोड्या प्रमाणात कोकीन, ब्राउनशुगर या अमली पदार्थांची द्रव्ये आढळून येत आहेत. एखाद्या मुला-मुलीने ते चॉकलेट खाल्ले तर त्याला त्याची सवय लागते.ड्रग्जच्या व्यसनात अडकल्याची लक्षणे काय?१) मुले एकलकोंडी होतात.२) मुले हिंसक बनतात. उदा. कुणाच्या डोक्यात दगड घाल, मारहाण कर वगैरे३) एकादी वस्तू मागितल्यावर पालकांनी लगेच द्यायलाच पाहिजे, अन्यथा मुले आत्महत्येची धमकी देतात.अमली पदार्थांमधील नवा प्रकार ‘हायड्रोपोनिक किंवा हायड्रो गांजा’हायड्रोपोनिक किंवा हायड्रो गांजा म्हणजे मातीशिवाय वाढवली जाणारी व पाण्यावर वाढणारी गांजाची वनस्पती. अमेरिका, थायलंडमध्ये हा प्रकार आढळतो. जगभरात हायड्रो गांजाची तस्करी आणि विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हायड्रोपोनिक किंवा हायड्रो गांजा हे राज्यासाठी मोठे आव्हान ठरत असल्याचे सांगून, २१ किलो हायड्रो गांजासह दोन इंडोनेशियन नागरिकांना नुकतीच अटक करण्यात आली आहे.गेल्या सहा महिन्यात १८७ मुला-मुलींचे समुपदेशनअमली पदार्थ मिश्रित चॉकलेटचे व्यसन लागलेल्या महापालिका तसेच उच्चभ्रू शाळांसह सर्वच माध्यमांमधील जवळपास १८७ मुला-मुलींसह पालकांचे गेल्या सहा महिन्यात (जानेवारी ते जुलै) समुपदेशन करण्यात आले आहे. या चॉकलेटचे वेगवेगळे रंग असतात, त्याला आकर्षक पद्धतीने प्राणी, पक्षी व वाद्यांचा शेप दिलेला असतो. आम्ही अशी चॉकलेट जप्त करून ती नार्कोटिक्स विभागाकडे दिली असल्याची माहिती डॉ. मिलिंद भोई यांनी दिली.

आज पालकांचा मुलांशी संवाद कमी झाला आहे. मुले त्यांच्याच विश्वात असतात. मात्र, पालकांनी मुलांशी संवाद वाढविणे गरजेचे आहे. मुलगा एकलकोंडा, ॲग्रेसिव्ह राहात असेल किंवा आदळआपट करत असेल तर या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. मुले घरी आल्यावर पालकांनी स्वतः मोबाइल बाजूला ठेवून मुलांशी बोलले पाहिजे. - डॉ. मिलिंद भोई, समन्वयक, अमली पदार्थविरोधी अभियान, भोई प्रतिष्ठान मुलांमध्ये अमली पदार्थांसह व्हेप, व्हाइटनर या पदार्थांची देखील नशा केली जात आहे. शहरातील किशोरवयीन मुला-मुलींमध्ये व्यसन परावृत्तीविषयी जागृती करण्याच्या हेतूने ‘ताराचंद रामनाथ सेवा ट्रस्ट’ आणि ‘ज्ञानप्रबोधिनी संशोधन संस्था’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘निर्धार’ व ‘संयम’ हे दोन उपक्रम राबविले जात आहेत. ‘निर्धार’ हा उपक्रम पाचवी ते सातवी इयत्तेतील मुला-मुलींसाठी तर ‘संयम’ आठवी ते दहावी इयत्तेतील मुला-मुलींसाठी राबविला जात आहे. या उपक्रमांद्वारे समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील मुलांशी शाळांमध्ये जाऊन ‘ताई’ संवाद साधून त्यांचे समुपदेशन करतात. - सुजाता होनप, प्रकल्प प्रमुख, निर्धार, ‘ज्ञान प्रबोधिनी संशोधन संस्था 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी