शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी जमिनींची खरेदी-विक्री आता दुय्यम निबंधकच रोखणार, राज्य सरकारने केली कायद्यात तरतूद

By नितीन चौधरी | Updated: June 1, 2025 12:21 IST

जमिनींची परस्पर होणारी खरेदी-विक्री थांबून सरकारची व नागरिकांची फसवणूक टळणार आहे.

पुणे : सरकारी जमिनींची खरेदी-विक्री विनापरवानगी होत असल्यास आता दुय्यम निबंधकच रोख शकणार आहे. राज्य सरकारने याबाबत नोंदणी कायद्यात तरतूद केली आहे. तसेच देवस्थान इमानी जमीन, वतन जमीन, वनजमीन, गायरान, पुनर्वसनासाठी दिलेल्या अशा वर्ग २ च्या जमिनींच्या खरेदी-विक्रीसाठीही सक्षम प्राधिकाऱ्याची परवानगी लागणार आहे. केंद्रीय तसेच राज्यस्तरीय वसुली संस्थांनी जप्त केलेल्या जमिनींबाबत विनापरवानगी दस्त नोंदणी करता येणार नाही अशी तरतूदही यात करण्यात आली आहे. त्यामुळे अशा जमिनींची परस्पर होणारी खरेदी-विक्री थांबून सरकारची व नागरिकांची फसवणूक टळणार आहे.

राज्य सरकारने नोंदणी कायद्यातील दुरुस्तीचे राजपत्र प्रसिद्ध केले आहे. त्यात या तीन महत्त्वाच्या तरतुदी केल्या आहेत. या कायद्यातील १८व्या परिशिष्टात प्रतिबंधित जमिनींच्या खेरदी-विक्रीबाबत दुय्यम निबंधकांना निर्देशांचा समावेश करण्यात आला होता. मात्र, त्यात काही बाबींचा स्पष्ट उल्लेख नसल्याने यातील पळवाटांचा गैरफायदा घेत अनेकजण सरकारची फसवणूक करत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे या तीन महत्त्वांच्या तरतुदी करण्यात आल्याची माहिती पुणे शहर सहजिल्हा निबंधक संतोष हिंगाणे यांनी दिली.

राज्य नोंदणी कायद्यातील नियम ४४ नुसार केंद्र व राज्य सरकारने प्रतिबंधित केलेल्या जमिनींच्या खरेदी-विक्रीचा दस्त नोंदणीस आल्यास व त्यात सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घेतलेली नसल्यास पक्षकारांनी तशी परवानगी घ्यावी, असे निर्देश दुय्यम निबंधक देऊ शकत होते. त्यात बनावट परवानगी देण्याचे प्रकार उघडकीस आले होते. त्यामुळे अशा व्यवहारांमध्ये अनेक गैरप्रकार होत असल्याने राज्य सरकारने आता यात १८ अ या उपपरिशिष्टाचा समावेश केला आहे. आता दुय्यम निबंधक असा व्यवहार विनापरवानगी होत असल्यास हा दस्तच नाकारू शकणार आहेत. त्यासाठी कोणाचीही परवानगीची आवश्यकता भासणार नाही. यामुळे असे बेकायदा व्यवहार दुय्यम निबंधकांच्या पातळीवरच रोखता येणार आहेत.

पूर्वी केंद्र व राज्य सरकारच्या मालकीच्या तसेच वर्ग २ (देवस्थान इमानी जमीन, वतन जमीन, वनजमीन, गायरान, पुनर्वसनासाठी दिलेल्या) जमिनींच्या व्यवहारांमध्ये विनाताबा साठे करता येते होते. त्यावेळी प्रथम खरेदीपत्र देऊन सक्षम प्राधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर जमिनीचा ताबा दिला जात होता.याच परिशिष्टात १८ ब या नव्याने समाविष्ट केलेल्या उपपरिशिष्टामुळे असे करता येणार नाही. अशा जमिनींबाबत साठेखत किंवा बक्षीसपत्र (गिफ्ट डीड) करता येणार नाही. असे व्यवहार करताना सक्षम प्राधिकाऱ्याची परवानगी आवश्यक करण्यात आली आहे, तर केंद्र व राज्य सरकारने किंवा त्यांच्या आर्थिक वसुली संस्था जसे ईडी, सीबीआय, प्राप्तीकर विभाग यांनी जप्त केलेल्या जमिनींच्या व्यवहारांवरही बंधने आणली आहेत. असे व्यवहार आता विनापरवानगी असल्यास व सातबारा उतारा किंवा मिळकत पत्रिकेवर असे शेरे असल्यास दुय्यम निबंधकच असे व्यवहार नाकारणार आहेत.

या तरतुदींमुळे अशा जमिनींची परस्पर होणारी खरेदी-विक्री थांबून सरकारची व नागरिकांची फसवणूक टळणार आहे.  - संतोष हिंगाणे, सहजिल्हा निबंधक, पुणे शहर

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAgriculture Schemeकृषी योजनाAgriculture Sectorशेती क्षेत्र