शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘इंडियाज बिगेस्ट होळी’ वादात; ना पाेलिस परवानगी, ना पार्किंगची साेय; तरीही आयाेजित केला जाताेय ‘कॉन्सर्ट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 12:03 IST

- नगर रस्त्यावरील नागरिक धास्तावले; करण औजला याच्या दिल्लीतील कार्यक्रमात झाला हाेता गाेंधळ 

पुणे : खराडी येथील महालक्ष्मी लॉन्स येथे ‘इंडियाज बिगेस्ट होळी’ कार्यक्रम मंगळवारी (दि.३) होणार आहे. यासाठी कॅनेडियन पंजाबी गायक करण औजला उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमास माेठी गर्दी हाेण्याची शक्यता असून, पार्किंगची पुरेसी व्यवस्था नसल्याने नागरिक आपली वाहने नगर रस्त्यावर लावण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे औजला याच्या दिल्लीतील कार्यक्रमात गाेंधळ झाल्याची घटना ताजी असताना आणि कार्यक्रमास पाेलिस परवानगी नसतानाही आयाेजक दहा ते पंधरा हजार चाहत्यांची गर्दी जमवण्याची धडपड करत आहेत. हा सर्व प्रकार पाहून स्थानिक नागरिक तीव्र चिंता व्यक्त करत आहेत.

दरम्यान, करण औजला याच्या शनिवारीच दिल्लीत झालेल्या कार्यक्रमादरम्यान गोंधळ, हाणामारीचा प्रकार घडला हाेता. अपुरी पार्किंग व्यवस्था आणि वाहतूककोंडी आदींचा सामना चाहत्यांना करावा लागला हाेता. त्यामुळे तीव्र नाराजी पसरली हाेती. आता पुण्यात होणाऱ्या आगामी कॉन्सर्टबाबतही तिच भीती व्यक्त केली जात आहे.

या कार्यक्रमासाठी सुमारे १० ते १५ हजार नागरिक उपस्थित राहणार आहेत; पण पार्किंगची व्यवस्था नसल्याने प्रचंड वाहतूक कोंडी होण्याच्या भीतीने नगर रस्त्यावरील नागरिक धास्तावले आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन बिग ड्रीम एंटरटेनमेंटचे आर्यन नवले यांच्याकडून करण्यात आले असून, कॅनेडियन टॉप रेटेड पंजाबी गायक, रॅपर आणि गीतकार करण औजला यांची विशेष उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमाची जाहिरात मोठ्या प्रमाणावर होत असली तरी स्थानिक नागरिकांनी संभाव्य वाहतूक कोंडीबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

वाहने पार्क करणार कुठे ?

खराडी परिसरातील महालक्ष्मी लॉन्स येथे मंगळवारी (दि.३) करण औजला याच्या कॉन्सर्टचे आयाेजन केले आहे. या लॉन्सची एकूण जागा सुमारे १५ एकर असल्याचे सांगितले जाते. मात्र, स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, त्यापैकी सुमारे १२ एकर जागेत सध्या खोदकाम झालेले असून, मातीचे ढिगारे आहेत. त्यामुळे पार्किंगसाठी प्रत्यक्षात केवळ तीन एकर जागा उपलब्ध असल्याचा दावा केला जात आहे. या मर्यादित जागेत पार्किंगची व्यवस्था करणार कशी ? उर्वरित वाहने पार्क करणार कुठे ?, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

...तर जबाबदार काेण?

सध्या कार्यक्रमासाठी स्टेज आणि टेंट उभारण्याचे काम सुरू असून, सुमारे १५ हजार प्रेक्षक कॉन्सर्टला उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, वाहनतळाबाबत कोणतेही ठोस नियोजन नाही. परिणामी, कॉन्सर्टसाठी येणारे चाहते नगर रस्त्यावर दोन्ही बाजूंनी वाहने उभी करण्याची शक्यता आहे. आधीच खराडी ते वाघोलीदरम्यान या मार्गावर मोठी वाहतूक असते. त्यात रस्त्यावरच पार्किंग झाल्यास गंभीर वाहतूक कोंडी हाेण्याची शक्यता आहे. तसेच दिल्ली येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर चाहत्यांमध्ये काही हाणामारीचा प्रकार घडलाच तर जबाबदारी काेण घेणार ? असाही प्रश्न उपस्थित हाेत आहे.

इंडियाज बिगेस्ट होळी या खराडी येथील महालक्ष्मी लॉन्स येथे होणाऱ्या कार्यक्रमाला अद्यापपर्यंत आमच्याकडून कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही.  - संजय पाटील, अपर पोलिस आयुक्त, प्रशासन.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Concert Faces Concerns: No Permits, Parking Chaos Feared.

Web Summary : Kharadi's 'India's Biggest Holi' concert, featuring Karan Aujla, faces opposition due to lack of police permits and parking. Following Delhi chaos, concerns arise about traffic and safety for expected ten thousand attendees. Residents fear Nagar road gridlock due to limited parking space at the venue.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे