पुणे : राज्यभरातील महापालिकांमध्ये राबविण्यात येणाऱ्या कुटुंब नियोजन उपक्रमात पुणे महापालिकेने मागील तीन वर्षांत उल्लेखनीय कामगिरी करीत राज्यात प्रथम स्थान पटकावले आहे. कायमस्वरूपी तसेच तात्पुरत्या उपाययोजनांच्या अवलंबात झालेली मोठी वाढ शहरातील नागरिकांचा कुटुंब कल्याण उपक्रमावरील वाढता विश्वास अधोरेखीत करत आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, २०२२-२३ या वर्षात २५४ पुरुषांनी एनएसव्ही नसबंदी शस्त्रक्रिया केली. त्याच काळात १,६१४ महिलांनी अंतरा इंजेक्शनचा, तर तब्बल १०,०४१ महिलांनी छाया गोळ्यांचा वापर करून कुटुंब नियोजन स्वीकारले आहे.
पुढील २०२३-२४ या वर्षात कुटुंब नियोजनात लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली आहे. या काळात तब्बल १,९२८ पुरुषांनी नसबंदी केली. तसेच ९,२०० महिलांनी अंतरा इंजेक्शन घेतले, तर १२,९५६ महिलांनी छाया गोळ्यांचा अवलंब केला. २०२४-२५ मध्ये मात्र नागरिकांचा प्रतिसाद स्थिर राहिला आहे. या वर्षात ३७३ पुरुषांनी एनएसव्हीची निवड केली असून, १,८०१ महिलांनी अंतरा इंजेक्शनचा लाभ घेतला. चालू आर्थिक वर्षात (एप्रिल ते नोव्हेंबर २०२५) कुटुंब नियोजनात उत्साहवर्धक वाढ नोंदली गेली आहे. आतापर्यंत ८५४ पुरुषांनी नसबंदी स्वीकारली असून, ७,२०४ महिलांनी अंतरा इंजेक्शन घेतले आहे. २८२ महिलांनी छाया गोळ्यांचा पर्याय निवडला आहे. महापालिकेच्या सातत्यपूर्ण जनजागृती मोहिमा, सुलभ सेवा, प्रशिक्षित कर्मचारी, तसेच मोफत उपलब्ध उपचारांमुळे नागरिकांचा विश्वास वाढत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
सातत्याने केलेली जनजागृती, सुलभ सुविधा आणि प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी यांच्या जोरावर नागरिकांमध्ये कुटुंब नियोजनाबाबत सकारात्मक बदल दिसून येत आहे. ही कामगिरी संपूर्ण यंत्रणेकरिता प्रेरणादायी आहे. - डॉ. राजेश दिघे, सहायक आरोग्य व नोडल अधिकारी, कुटुंब कल्याण विभाग, पुणे महापालिका
Web Summary : Pune Municipal Corporation excels in family planning, leading Maharashtra. Increased adoption of permanent and temporary methods shows growing public trust. Sterilization and contraceptive use have significantly risen over the past three years, showcasing successful public health initiatives.
Web Summary : पुणे महानगरपालिका परिवार नियोजन में अव्वल, महाराष्ट्र में अग्रणी। स्थायी और अस्थायी तरीकों को अपनाने में वृद्धि सार्वजनिक विश्वास दर्शाती है। पिछले तीन वर्षों में नसबंदी और गर्भनिरोधक उपयोग में वृद्धि हुई, जो सफल सार्वजनिक स्वास्थ्य पहल दिखाती है।