शहरं
Join us  
Trending Stories
1
महाडमध्ये शिंदेसेना अन् राष्ट्रवादीत तुफान राडा; वाहनांची तोडफोड, तटकरे-गोगावले संघर्ष पेटला
2
न्यूयॉर्कमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे बालपणीचे घर विक्रीला निघाले;  २०१६ मध्ये ट्रम्प यांना आठवण झालेली...
3
कमाल झाली! चाहता मैदानात घुसला; सामना थांबला आणि हार्दिक पांड्यानं हसत सेल्फीसाठी दिली पोझ
4
पाकिस्तानमध्ये 'एचआयव्ही'चा कहर! १५ वर्षांत रुग्णसंख्या तिपटीने वाढली; लहान मुलांनाही संसर्ग! 
5
भाडे देणे म्हणजे खर्च नाही, तर आर्थिक स्वातंत्र्य! घर खरेदीच्या मोहात पडण्यापूर्वी 'हे' गणित समजून घ्या!
6
Video: विराट - गंभीरमधील वाद ताणला गेला का? एअरपोर्टवर सिलेक्टरशी किंग कोहलीशी गंभीर चर्चा
7
कर्जमुक्त असलेल्या कंपनीच्या शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या, २०% चं अपर सर्किट; ₹३३ वर आली किंमत
8
"प्रत्येक नागरिकाच्या फोनमध्ये प्रवेश कशाला?"; 'संचार साथी' ॲपवरुन प्रियांका गांधींचा केंद्राला थेट सवाल
9
कार बाजारात मोठा उलटफेर; ह्युंदाई चौथ्या क्रमांकवर फेकली गेली, पहिली मारुती, दोन, तीन नंबरला कोण? 
10
१५ डिसेंबरपूर्वी करा 'हे' महत्त्वाचं काम; अन्यथा भरावा लागेल मोठा दंड
11
'संचार साथी' ॲपचे ५ महत्त्वाचे फीचर्स : चोरी झालेले फोन ब्लॉक करा आणि फ्रॉडला आळा घालण्यापर्यंत...
12
अरेरे! "५ लाख वाया गेले, माझी सर्व अब्रू गेली..."; नवरदेवाची व्यथा, नवरीने २० मिनिटांत मोडलं लग्न
13
पती की राक्षस? हुंड्यासाठी पत्नीचा छळ; नवऱ्याने इंजेक्शनं टोचली, तर नणंदबाईने गर्भपाताच्या गोळ्या दिल्या!
14
Gold Silver Price Today: मोठ्या तेजीनंतर आज सोन्या-चांदीचे दर घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची किंमत
15
Prajakta Gaikwad Wedding: खुटवड कुटुंबाची सून झाली प्राजक्ता गायकवाड, खऱ्या आयुष्यातही शंभुराजांशी बांधली लग्नगाठ
16
IND vs SA: सुरक्षा भेदून विराट कोहलीच्या पायाला स्पर्श; 'त्या' चाहत्याला शिक्षा झाली का? 
17
डीके शिवकुमारांना मुख्यमंत्रिपदाची संधी कधी मिळणार? CM सिद्धारमैया थेट बोलले...
18
तुमचं गृहकर्ज, वाहन कर्ज स्वस्त होणार? आरबीआय डिसेंबरमध्ये रेपो दरात २५ बेसिस पॉईंटची कपात करणार?
19
एअर इंडियाची मोठी चूक, 'एअरवर्दीनेस सर्टिफिकेट' एक्सपायर असतानाही ८ वेळा उड्डाण; डीजीसीएकडून दणका
20
8th Pay Commission: जानेवारीपासून बँक खात्यात येणार का वाढलेली सॅलरी? ८ व्या वेतन आयोगाशी निगडीत कनफ्युजन करा दूर
Daily Top 2Weekly Top 5

Local Body Election : निवडणुकीतून माघार घ्या; अन्यथा संतोष देशमुख करू..! AAP उमेदवाराला धमकी

By किरण शिंदे | Updated: December 2, 2025 13:50 IST

“निवडणुकीतून माघार घ्या, अन्यथा तुमचा संतोष देशमुख करू,” अशा शब्दांत धमकी देत बनसोडे यांची कार अडवण्यात आल्याबद्दल अज्ञात आरोपीवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

पुणे : फुरसुंगी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आम आदमी पार्टीचे उमेदवार यशवंत अरुण बनसोडे (वय ४२) यांना अज्ञात व्यक्तीने कार अडवून जीवघेणी धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. “निवडणुकीतून माघार घ्या, अन्यथा तुमचा संतोष देशमुख करू,” अशा शब्दांत धमकी देत बनसोडे यांची कार अडवण्यात आल्याबद्दल अज्ञात आरोपीवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यशवंत बनसोडे हे १ डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ ते नऊच्या सुमारास सासवड रोड रेल्वे स्टेशन परिसरातून चारचाकीने जात होते. त्याच वेळी एका अनोळखी व्यक्तीने हात दाखवून त्यांचे वाहन थांबवले. वाहन थांबवतात तोच तो इसम पुढे आला आणि निवडणुकीतून माघार घेण्यास जबरदस्ती करत धमकी दिली. माघार नाही घेतली तर तुमचा संतोष देशमुख करू अशा शब्दात त्याने धमकी दिली. फिर्यादींच्या तक्रारीनुसार त्या इसमाच्या कमरेला लोखंडी शस्त्र लपवलेले होते. एवढेच नव्हे तर रेल्वे पटरीजवळ दुसरा एक अनोळखी व्यक्ती उभा असल्याचेही त्यांनी पाहिले. त्याच्याजवळ देखील शस्त्र असण्याची शक्यता तक्रारीत नमूद आहे. ही संपूर्ण घटना पाहून फिर्यादींनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली.फुरसुंगी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १२६(२), ३५२(३) तसेच महाराष्ट्र पोलीस संरक्षण अधिनियम ३७(१)(३) सह १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक महेश नलवडे या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने फुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषदेची निवडणूक स्थगित केली आहे. नगराध्यक्ष, सदस्य व इतर सर्व पदांची निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली असून, निवडणूक प्रक्रिया पुन्हा ४ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. मात्र निवडणूक स्थगित असतानाही नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारालाच धमकी देण्यात आल्याने  खळबळ उडाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : AAP Candidate Threatened to Withdraw from Local Election

Web Summary : AAP candidate Yashwant Bansode received death threats, pressured to withdraw from the Furursungi Nagar Parishad election. Police have registered a case against unknown individuals. Election postponed, probe ongoing.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडLocal Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकZilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूकPuneपुणेElectionनिवडणूक 2024