शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
3
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
4
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
5
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
6
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
7
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
8
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
9
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
10
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
11
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
12
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
13
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
14
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
15
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
16
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
17
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
18
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
19
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
20
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी

Leopard Attack : ड्रोन, डार्ट आणि गोळीबाराचा थरार; पिंपरखेडमध्ये नरभक्षक बिबट ठार, पण भीती कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 11:02 IST

दोन लहान मुले आणि एका वृद्ध महिलेसह रोहन विलास बोंबे (वय १३) याचा समावेश होता. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी अनेक ठिकाणी तीव्र आंदोलन केले होते.

मलठण ( पु जि.) - आंबेगाव, शिरूर आणि जुन्नर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या बिबट्यांच्या दहशतीला अखेर विराम मिळाला आहे. पिंपरखेड (ता. शिरूर) परिसरात वनविभागाने राबवलेल्या नियोजनबद्ध मोहिमेत नर बिबट्याला गोळी घालून ठार करण्यात यश आले. या कारवाईनंतर नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

गेल्या दीड महिन्यांत बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये चार निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे परिसरात भीतीचं आणि अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालं होतं. नागरिकांकडून वारंवार ठोस कारवाईची मागणी होत होती. यासाठी पिंपरखेड, जांबुत ग्रामस्थ यांनी पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले होते. जनतेचा वाढता रोष व, माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विनंतीनंतर नागपुर प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी बिबट्याला ठार मारण्याची परवानगी देण्यात आली होती.

परवानगी मिळाल्यानंतर वनविभागाने विशेष पथक तयार करून बिबट्याला ठार करण्यासाठी शार्प शूटर टीम पाठवण्यात आली होती पिंपरखेड परिसरात बिबट्याची शोध मोहीम राबवून  रात्री पिंपरखेड परिसरात त्या नर बिबट्याला ठार करण्यात आले आहे. गेल्या दहा वर्षांत प्रथमच अशा प्रकारे बिबट्याला ठार मारण्याची कारवाई करण्यात आली आहे. वनविभागाच्या या मोहिमेत स्थानिक पथकासोबत तज्ज्ञ शूटरचाही सहभाग होता.

दरम्यान, गेल्या काही दिवसांत वनविभागाने एकूण दहा बिबट्यांना जेरबंद करण्यात यश मिळवलं आहे. या सलग कारवायांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या संदर्भात सहायक वनसंरक्षक अधिकारी स्मिता राजहंस म्हणाल्या, “गेल्या काही दिवसांपासून वनविभागाचे कर्मचारी सतत भीतीच्या वातावरणात काम करत आहेत. मात्र, त्यांनी मोठ्या हिमतीने मोहिम पार पाडली. नागरिकांचा जीवितहानीचा धोका टळावा यासाठी पुढील काही दिवस विभाग परिसरात गस्त आणि शोधमोहीम सुरू ठेवणार आहे. बिबट्याला ठार मारल्यानंतर वनविभागाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पुढील अहवाल सादर केला आहे. स्थानिक ग्रामस्थांनी वनअधिकाऱ्यांचे आभार मानत या कारवाईचे स्वागत केले आहे. 

आज दि. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पिंपरखेड येथील नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात यश मिळालं आहे. गेल्या २३ वर्षांमध्ये दोन वेळा परवानग्या मिळूनही नरभक्षक बिबट्याला मारण्यात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना यश मिळालं नव्हतं, पण आज प्रथमच हे यश मिळताना पाहून समाधान वाटतंय. या कामगिरीबद्दल वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मी आभार मानतो. गेल्या काही दिवसात या बिबट्यामुळे आपण आपल्या जिवाभावाची जी माणसं गमावली त्यांच्याप्रति संवेदना व्यक्त करतो  - माजी मंत्री दिलीप वळसे पाटील 

English
हिंदी सारांश
Web Title : Man-eating Leopard Killed in Pimparkhed After Fatal Attacks; Fear Persists

Web Summary : A man-eating leopard, responsible for three deaths in Pimparkhed, was shot dead after failed dart attempts. The attacks sparked public outrage and protests. While the immediate threat is gone, fear remains, and villagers demand lasting solutions to prevent future incidents.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेleopardबिबट्या