पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्याच्या पहिल्या टप्प्यात ५० मीटर रुंदीच्या रस्त्याचे आवश्यक भूसंपादनासाठी असणारी रक्कम उपलब्ध करून दिली जात आहे. या रस्त्यासाठी भूसंपादनाचा मोबदला आणि त्याबाबतच्या तक्रारीसाठी स्वतंत्र कक्ष तेथेच सुरू केला जाणार आहे. त्यामध्ये पालिकेचे अधिकारी आणि भूसंपादन अधिकारी असणार आहे.
भूसंपादन करण्यासाठी टीडीआरवरही भर दिला जाणार आहे. येत्या डिसेंबर अखेरपर्यंत या पुणे महापालिकेच्या कात्रज ते कोंढवा रस्ता, हरित पट्टत्वामधील बेकायदा होणारे उत्खनन आणि पुणे ग्रॅण्ड सायकल दूरची कामे याबाबत महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या रस्त्याचे भूसंपादन केले जाणार आहे.उपस्थितीत बैठक झाली. यावेळी पालिका आणि भूसंपादन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी ही माहिती दिली. कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामाला ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी मान्यता मिळाली आहे. या रस्त्यांच्या भूसंपादनासाठी ७१० कोटी रुपये हवे आहेत. भूसंपादनामुळे रेंगाळलेल्या या रस्त्याची रुंदी ८४ ऐवजी ५० मीटर करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. भूसंपादनासाठी टीडीआरवरही भर दिला जाणार आहे. त्यामुळे पालिकेचे भूसंपादनाचे ५० ते ६० कोटींची बचत होण्याची शक्यता असल्याचे आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.
सायकल टूरच्या कामाचा आढावापुणे ग्रॅण्ड सायकल टूर या आंतराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी शहरात ७५ किलोमीटरचे रस्ते विकसित केले जात आहेत. त्याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. या रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या भिंती रंगविल्या जाणार आहेत. एका कलाकाराला दिवसाला १ हजार रुपये दिले जाणार आहेत. चित्र काढण्यासाठी लागणारे साहित्य पालिका देणार आहे, असेही आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.निम्म्याहून अधिक भूसंपादन झालेकात्रज-कोंढवा रस्त्याचे काही प्रमाणात टीडीआर देऊन भूसंपादन झाले आहे. त्यामुळे हा रस्ता तुकड्या तुकड्यामध्ये तयार आहे. यासाठी आवश्यक जागेच्या भूसंपादनाअभावी रस्त्याचे काम रखडले आहे. कात्रज-कोंढवा रस्त्याच्या ५० मीटर रुंदीसाठी ९४ हजार चौरस मीटर जागेचे भूसंपादन करणे आवश्यक आहे. त्यापैकी निम्म्याहून अधिक जागेचे भूसंपादन झाले आहेत.
Web Summary : Land acquisition for the Katraj-Kondhwa road's first phase will be completed by December. Compensation and grievance redressal cells established. Focus on TDR for acquisition, potentially saving the municipality crores. Cycle tour work also reviewed.
Web Summary : कात्रज-कोंढवा सड़क के पहले चरण के लिए भूमि अधिग्रहण दिसंबर तक पूरा होगा। मुआवजे और शिकायत निवारण प्रकोष्ठ स्थापित। अधिग्रहण के लिए टीडीआर पर ध्यान केंद्रित, संभावित रूप से नगरपालिका को करोड़ों की बचत। साइकिल यात्रा कार्य की भी समीक्षा की गई।