शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गांवरील कोंडीमुळे लालपरी, ई-शिवाई, शिवनेरीला फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 16:18 IST

- ई-शिवाई, शिवनेरीचे चार्जिंग डाऊन; पाच-तास प्रवासाला लागताहेत सात ते आठ 

पुणे : प्रवाशांची प्रचंड गर्दी, गाड्यांच्या रांगा, महामार्गावरील वाहतूककोंडीने परतीच्या प्रवासासाठी पुणे, मुंबईकडे निघालेल्या चाकरमान्यांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागत आहे. एरव्ही सोलापूरहून पुण्याला पोहोचण्यासाठी पाच तास लागतात. परंतु, महामार्गावरील कोंडीमुळे या प्रवासासाठी तब्बल सात ते आठ तास लागत आहेत. यामुळे सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, लातूर, बीड व इतर आगारांतून पुणे, मुंबईला जाणाऱ्या लालपरी, ई-शिवाई, शिवनेरीला नियोजित वेळेत पोहोचण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर नागरिक परत त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी निघाले आहेत. यामुळे बसस्थानक, खासगी ट्रॅव्हल्स आणि रेल्वेला प्रचंड गर्दी आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाकडून पुणे, मुंबई या प्रमुख शहरांसाठी जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. परंतु, दिवाळीत चारचाकी घेऊन बाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त असल्यामुळे महामार्गावर वाहतूककोंडी होत आहे. परिणामी, फेरी पूर्ण होण्यास वेळ लागत आहे. त्यामुळे ई-शिवाई, शिवनेरीचे चार्जिंग डाऊन होते. त्याचा परिणाम पुढील फेरीवर होत आहे.पुणे एसटी विभागातून दादर, बोरिवली, ठाणे, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, बीड, सातारा या शहरांदरम्यान ई-शिवाई, शिवनेरी बस धावतात. कोंडीमुळे नियोजित फेरीपेक्षा जादा फेऱ्यांचे नियोजन एसटी प्रशासनाकडून करण्यात येते. दरम्यान, दिवाळीमुळे गावी, पर्यटनाला जाणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त असते. परंतु, वाहतूक कोंडीत अडकल्याने ई-शिवाई, शिवनेरीच्या बॅटरी (चार्जिंग) डाऊन होत आहेत. याचा परिणाम पुढील फेऱ्यांवर होत आहे, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली. 

नोकरीवर वेळेत जाण्यासाठी धडपड अन...

तीन, चार दिवसांच्या सुटीनंतर पुण्यात नोकरी करणारे माघारी निघाले आहेत. त्यामुळे सर्व बसेसना प्रचंड गर्दी आहे. शिवाय आगाऊ आरक्षणही फुल्ल झालेले असते. त्यामुळे अनेकजण चारचाकी घेऊन गेलेले पुणे, मुंबईचे नोकरदार कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी रात्रीच निघत आहेत. परंतु, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून महामार्गावर कोंडीमुळे नोकरदारांना वेळेत पोहोचण्यासाठी धडपडत यावे लागत आहे. 

चार ते पाच किलोमीटर अंतरासाठी दीड ते दोन तास

छत्रपती संभाजीनगर - पुणे, नाशिक - पुणे, कोल्हापूर - पुणे, सोलापूर - पुणे, मुंबई मार्गावर वाहतूक कोंडीने चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत. त्यामुळे चार ते पाच किलोमीटरचे अंतर गाठण्यासाठी दीड ते दोन तासांचा वेळ लागल्याचे काही वाहनधारकांनी सांगितले. 

...इथे होते वाहतूक कोंडी

नाशिकवरून येताना संगमनेर, आळेफाटा, नारायणगाव, राजगुरूनगर, चाकण औद्योगिक क्षेत्र, मोशी, भोसरी. कोल्हापूरवरून येताना तासवडे टोलनाका, कराड, सातारा, कात्रज नवीन बोगदा, नवले पूल, खेड शिवापूर टोलनाका परिसर, सोलापूरहून येताना लोणी काळभोर, उरळी कांचन, यवत. छत्रपती संभाजीनगर महामार्गावरून येताना शिरूर बायपास, रांजणगाव, कारेगाव, शिक्रापूर, सणवाडी, काेरेगाव, वाघोली, चंदननगर या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे प्रमुख मार्गांवर दोन ते चार किलोमीटरची रांग लागत आहेत.

पुण्यातून धावणाऱ्या ई-बसेसची आकडेवारी :

शहर - ई-बसेस संख्या

ठाणे - २०

दादर - २०

बोरिवली - २०

सोलापूर - १०

छत्रपती संभाजीनगर - १०

कोल्हापूर - १०

नाशिक - १०

बीड - ५

सातारा - ५

बारामती- ५

English
हिंदी सारांश
Web Title : Highway Congestion Hits State Transport Buses: Schedules Disrupted

Web Summary : Highway congestion after Diwali is severely delaying state transport buses like Lalpari and Shivneri. Passengers face extended travel times, with routes taking seven to eight hours instead of five. E-bus charging is also affected, disrupting schedules to major cities.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड