वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील वेटलिफ्टिंगची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडगाव शहरातील हर्षदा गरुडने ग्रीसमधील जागतिक ज्युनिअर वेटलिफ्टिंग स्पर्धेत १५३ किलो वजन उचलून ४५ किलो गटात सुवर्णपदक जिंकून विक्रम केला होता. सध्या वेटलिफ्टिंग खेळाडू ते क्रीडा अधिकारी असा तिचा प्रवास आहे.
वडगाव नगरपंचायतीमध्ये पाणी विभागात कार्यरत असलेले वडील शरद गरुड आणि मामांना आंतरराष्ट्रीय स्तरावर वेटलिफ्टिंग खेळात प्रगती करायची होती; पण ते यश मिळाले नाही म्हणून त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. हर्षदाच्या माध्यमातून ते स्वप्न साकारले आहे.
हर्पदा १२ वर्षांची असताना ५० किलो तांदळाची गोणी सहजपणे पाठीवर घेऊन घरात यायची. ही गोणी खाली ठेवून पुन्हा दुसऱ्यांदा हेच काम करायला ती सज्ज व्हायची. तिच्यात लहानपणापासूनच ते कौशल्य होते. ज्युनिअर गटात हर्षदा जगज्जेती झालीच आहे, आता सिनिअर गटातही असे घडावे अशी इच्छा आहे.
आता आहारावरही लक्ष
हर्षदाला चिकन, खेकडे आणि पावभाजी आवडते. मात्र, ती आता आहाराबाबत काटेकोर झाली आहे. वेटलिफ्टिंगमध्ये स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी संतुलित आहार कसा घ्यायचा आणि त्याचे वेळापत्रक कसे आखायचे हे क्रीडा प्राधिकरणाच्या अकादमीतून समजले आहे.
Web Summary : Harshada Garud, from Vadgaon Maval, transitioned from lifting rice bags to winning a gold medal at the Junior World Weightlifting Championship in Greece. Her father's unfulfilled dreams fueled her success. Now a sports officer, she maintains a strict diet for senior competitions.
Web Summary : वडगांव मावल की हर्षदा गरुड़ ने चावल की बोरियां उठाने से लेकर ग्रीस में जूनियर विश्व भारोत्तोलन चैंपियनशिप में स्वर्ण पदक जीतने तक का सफर तय किया। उनके पिता के अधूरे सपनों ने उनकी सफलता को बढ़ावा दिया। अब खेल अधिकारी, वह वरिष्ठ प्रतियोगिताओं के लिए सख्त आहार का पालन करती हैं।