शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या आदिवासी जमिनीवर बेकायदेशीर कब्जा;खेड तालुक्यातील कडूस येथील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 10:50 IST

- उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन, ठोस कारवाई करण्याची मागणी

राजगुरुनगर : खेड तालुक्यातील कडूस येथे आदिवासी ठाकर समाजाच्या जमिनीवर बेकायदेशीररीत्या कब्जा केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. गट क्रमांक ३७७५ मधील ही जमीन आठ व्यक्तींनी बेकायदेशीरपणे आपल्या नावावर करून घेतल्याचा आरोप आहे. याप्रकरणी कठोर कारवाई करावी आणि जमीन मूळ मालकांना परत मिळावी, या मागणीसाठी पीडित शेतकरी आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी खेड उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.या बेकायदेशीर व्यवहाराविरोधात फौजदारी कारवाई करावी आणि आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण करावे, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. आंदोलनात तुषार गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील गायकवाड, पीडित शेतकरी बबन काळे, भाऊ काळे, सीताराम जाधव, बबन भालेराव, पोपट पारधी, पंढरीनाथ पारधी यांच्यासह आदिवासी ठाकर समाजाचे बांधव सहभागी झाले. यावेळी मागण्यांचे निवेदन प्रांत अधिकारी अनिल दौंडे यांना सादर करण्यात आले.

परवानगी न घेता खरेदी-विक्रीचा व्यवहार

जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर ३६अ आणि ३६ब या कलमांनुसार शेरा असताना, सक्षम प्राताधिकाऱ्यांची परवानगी न घेता खरेदी-विक्रीचा व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. आदिवासी बांधवांच्या अशिक्षितपणा आणि अडाणीपणाचा गैरफायदा घेऊन हा गैरप्रकार घडल्याचा आरोप आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड