शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

HSC / 12th Exam : बारावी पेपरमध्ये सहाव्या दिवशी काॅपीचे २५ प्रकार उघड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 09:11 IST

राज्यात पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा एकूण नऊ विभागांत परीक्षा घेतली जात आहे.

पुणे : राज्यात इयत्ता बारावीची परीक्षा सुरू असून, सहाव्या दिवशी काॅपीचे २५ प्रकार उघड झाले आहेत. तर्कशास्त्र आणि भाैतिकशास्त्राचा पेपर हाेता. पाचव्या दिवशी काॅपीचे दोन प्रकार घडले हाेते. अपवाद फक्त चाैथ्या पेपरचा हाेता. सर्वच विभाग काॅपी प्रकरणात निरंक ठरलेल्या चाैथ्या दिवशी सकाळच्या सत्रात महाराष्ट्री प्राकृत, संस्कृत; तर दुपारच्या सत्रात अर्धमागधी, रशियन आणि अरेबिक विषयाचा पेपर हाेता.

साेमवारी सकाळच्या सत्रात तर्कशास्त्र आणि भौतिकशास्त्र विषयाचा पेपर झाला. या दरम्यान पुणे विभागात ९, नागपूर ५, छत्रपती संभाजीनगर ३, नाशिक १ आणि लातूर विभागात ७ अशी एकूण २५ प्रकरणे उघड झाली. मुंबई, कोल्हापूर, अमरावती, कोकण हे विभाग निरंक राहिले आहेत.

राज्यात पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा एकूण नऊ विभागांत परीक्षा घेतली जात आहे. राज्यात आतापर्यंत पहिल्या दिवशी अर्थात १० फेब्रुवारीला काॅपीची ४२ प्रकरणे आढळून आली हाेती. दुसऱ्या दिवशी चार प्रकरणे उघड झाली. तिसऱ्या दिवशीही काॅपीची ३० प्रकरणे उघड झाली. अपवाद चाैथा दिवस निरंक ठरला आणि पाचव्या दिवशी दाेन प्रकरणे उघड झाली. सहाव्या दिवशी पुन्हा २५ प्रकरणे उघड झाली. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांना काॅपीमुक्त आणि तणावमुक्त पेपर देता यावा म्हणून राज्य दक्षता समिती, जिल्हा दक्षता समितीने आवश्यक उपाययाेजना केल्या आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : HSC Exam: 25 Copying Cases Uncovered on Sixth Day

Web Summary : Maharashtra's HSC exams saw 25 copying cases on day six, mainly in logic and physics. Pune, Nagpur, and Latur reported the most incidents. Authorities are implementing measures for fair, stress-free exams.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रexamपरीक्षाHSC / 12th Exam12वी परीक्षा