शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

घरात बसलेले काहीजण म्हणजे रेव्ह पार्टी कशी होईल ? एकनाथ खडसेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 12:18 IST

- पोलिसांकडून घरावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप

पुणे : एका घरात चारजण बसलेले असतील, तर ती रेव्ह पार्टी कशी होईल? तसे संबोधून पोलिसांकडून जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केली. खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांना पोलिसांनी रेव्ह पार्टी प्रकरणात अटक केली आहे. खेवलकर यांची पत्नी व खडसे यांची कन्या असलेल्या रोहिणी खडसे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत.

रोहिणी खडसे यांनी सोमवारी रात्री पोलिस आयुक्त कार्यालयात जाऊन पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांची भेट घेतली. त्यानंतर एकनाथ खडसे मंगळवारी सकाळी पुण्यात आले. पत्रकारांबरोबर बोलताना त्यांनी आपल्या घरावर पोलिसांकडून पाळत ठेवली जात आहे, असा आरोप केला. खडसे म्हणाले, “डॉ. खेवलकर यांच्यावर यापूर्वी एकही गुन्हा दाखल नाही. तरीही त्यांना या प्रकरणात क्रमांक १चे आरोपी केली आहे. वैद्यकीय अहवाल माध्यमांपर्यंत कसा गेला? एका घरात बसलेल्या पाच-सहा जणांच्या पार्टीला रेव्ह पार्टी कसे म्हणता येईल? पोलिसांनी केलेली ही सर्व कारवाई एकतर्फी आहे.”

ससून रुग्णालयामधून यापूर्वी वैद्यकीय अहवाल बदलण्याचे प्रकार झाले आहेत. या प्रकरणाच्या अहवालातही काही फेरफार किंवा बदल होण्याची शक्यता असल्याचा संशय खडसे यांनी व्यक्त केला. वैद्यकीय तज्ज्ञांकडून अहवाल पोलिसांकडे दिला जातो. या प्रकरणात तो प्रसारमाध्यमांपर्यंत कसा पोहचला, असा प्रश्न त्यांनी केला.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड