राजगड : किल्ला राजगडावरील सुवेळा माचीवर परफ्युमच्या वासामुळे मधमाश्यांनी पर्यटकांवर हल्ला केल्याचा प्रकार घडला. या हल्ल्यामध्ये अनेक पर्यटक जखमी झाले आहेत. किल्ला राजगडावर वारंवार मधमाश्यांचे हल्ले होत असताना पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शक सूचनांकडे दुर्लक्ष करून निसर्गाच्या नियमांचाही भंग होतो आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये अतिउत्साही पर्यटकांच्या कारणाने किल्ला राजगडावर चार ते पाच वेळा मधमाश्यांच्या हल्ल्यांमध्ये दोनशेहून अधिक पर्यटक जखमी झाले आहेत, अशी गंभीर जखमी होण्याची घटना घडली आहे. त्यानंतर देखील शनिवारी सुमारे वीस ते पंचवीस पर्यटकांवर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे.
सुवेळा माचीवर दुपारच्या सुमारास वीसहून अधिक पर्यटकांवर मधमाश्यांचा हल्ला झाल्याची माहिती मिळताच स्थानिक कर्मचारी दादू वेगरे आणि बापू साबळे यांनी ताबडतोब घटनास्थळी जाऊन गंभीर जखमी असलेल्या सात ते आठ पर्यटकांना वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात आणि नसरापूर (ता. भोर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. राजगडावरील सुवेळा माचीवर कराड आणि मुंबई येथून पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांमधील एका महिला पर्यटकाला सुगंधी द्रव्य (परफ्युम) च्या वासामुळे मधमाशांनी चवटाळले, त्यानंतर मधमाशांच्या आक्रमणामुळे पर्यटकांवर जोरदार हल्ला झाला. अनेक जणांना त्यांच्या चावांमुळे वेदना सहन करावी लागली, ज्यामुळे आरडाओड व चिंता वाढली. जीव वाचवण्यासाठी पर्यटक सैरावैरा पळू लागले.
यामध्ये जखमी झालेल्या पर्यटकांनी तत्काळ १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला संपर्क साधला. त्याचबरोबर अधिक गंभीर जखमी पर्यटकांना पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी दादू वेगरे, बापू साबळे, दीपक पिलावरे, बाळू हिरवे, पोलिस पाटील नाना दरडिगे आणि इतर पर्यटकांच्या मदतीने गडावरून खाली आणण्यात आले. दरम्यान, वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात अविनाश चव्हाण (वय २५) व गणेश चव्हाण (वय २८), दोघेही साजूर (ता. कराड) येथील रहिवासी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे, असे डॉ. चंद्रकांत भोईट यांनी सांगितले तर इतर जखमी पर्यटकांवर भोर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचार सुरू आहेत.
Web Summary : Perfume sparked a bee attack on Rajgad Fort tourists, injuring many. Disregard for guidelines and nature led to repeated attacks, with over 200 injured in three months. Injured tourists were hospitalized, highlighting concerns about safety and environmental respect.
Web Summary : राजगढ़ किले में परफ्यूम की वजह से मधुमक्खियों ने पर्यटकों पर हमला किया, जिससे कई घायल हो गए। नियमों की अनदेखी के कारण हमले बढ़े, तीन महीनों में 200 से अधिक घायल हुए। घायल पर्यटकों को अस्पताल में भर्ती कराया गया।