निमगाव केतकी : “गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या” या गजरात निमगाव केतकी येथील केतकेश्वर गणेश मंडळाच्या मूर्तीचे विसर्जन उत्साहात व शांततेत पार पडले. ईद-ए-मिलाद निमित्त मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सर्व मुस्लिम कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत देखील मुस्लिम युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या केतकेश्वर मंडळाच्या मिरवणुकीत मुस्लिम युवक-युवतींचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मंडळाच्या वतीने फिरती स्क्रीन व चार सीसीटीव्ही बसवण्यात आले होते व त्याचे प्रक्षेपणही करण्यात आले.केतकेश्वर गणेश मंडळ तब्बल १९५२ वर्षांपूर्वी स्थापन झाले. बाबा गोपाल राऊत, ताजुद्दीन शेख, यासीन शेख, काशिनाथ राऊत, उत्तम राऊत, भीमराव बंडगर यांच्यासह युवक एकत्र येऊन या मंडळाची स्थापना केली. “हम सब एक है” हा नारा दिला आणि हीच परंपरा आजदेखील कायम आहे. मंडळाच्या वतीने लहान मुलांच्या स्पर्धा, महिलांसाठी होम मिनिस्टर, संमोहन तसेच करमणुकीचे विविध कार्यक्रम ठेवण्यात आले होते.मंडळाच्या वतीने विसर्जनासाठी आकर्षक विद्युत रोषणाई तसेच पद्मावती मंदिराचा देखावा करण्यात आला होता. सुहास जाधव, अक्षय चिखले, सचिन मुलाणी, रेहणा मुलाणी, सुनील कुदळे, अतुल होनराव, विकास बंडगर, निहाल शेख, धनेश राऊत, मनोज बंडगर, भावेश राऊत, शाहरुख शेख, जमीर पठाण, हनुमंत काळे, आकाश राऊत, सुमित चिखले, रवी कांबळे, अमित चिखले, ओंकार स्वामी, बबलू मुलाणी, प्रथमेश चिखले, बंडू भागवत, रोहित होनराव, शैलेश तांदळकर आदी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या मिरवणुकीसाठी विशेष परिश्रम घेतले. गुलाल व डीजेमुक्त मिरवणूककेतकेश्वर गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत गुलालाचा वापर न करता झेंडूच्या फुलांची उधळण केली जाते. लहान मुलांना व वृद्धांना होणाऱ्या डीजेच्या दुष्परिणामामुळे पारंपरिक वाद्यांना महत्त्व देण्यात आले. कर्नाटक, सारवाड येथील बहुरूपी भावल्यांचे आकर्षक नृत्य या मिरवणुकीत सहभागी करण्यात आले होते. त्यामुळे ही मिरवणूक नागरिकांना विशेष आकर्षित करत होती.मानवता हाच खरा धर्मदेशभरात सध्या जात-पात आणि धर्माच्या नावाने निर्माण होणारे तणावाचे वातावरण लक्षात घेता, निमगाव केतकी येथील केतकेश्वर गणेश मंडळ “हम सब एक है” या भावनेचे मूर्तिमंत उदाहरण आहे. गावातील हिंदू-मुस्लिम युवक श्रद्धेने या मंडळात व सर्व कार्यक्रमांत सहभागी होतात.
मानवता हाच खरा धर्म देशभरात सध्या जात-पात आणि धर्माच्या नावाने निर्माण होणारे तणा तणावाचे वातावरण लक्षात घेता निमगाव केतकी येथील केतकेश्वर गणेश मंडळ हम सब एक है या भावनेचे मूर्तिमूर्त उदाहरण आहे. गावातील हिंदू मुस्लिम युवक श्रद्धेने या मंडळात व सर्व कार्यक्रमात सहभागी होतात. - प्रशांत बंडगर ,अध्यक्ष केतकेश्वर गणेश मंडळ