शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापिकेच्या चिमुकलीचा विनयभंग; रिक्षावाल्याला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

By नम्रता फडणीस | Updated: April 3, 2025 16:59 IST

- मुख्याध्यापिका असून, त्यांची मुलगी त्यांच्याच शाळेत पहिलीमध्ये शिकते.

पुणे : सात वर्षीय चिमुकलीचा शाळेत ने-आण करणार्या रिक्षावाल्यानेच विनयभंग केल्याप्रकरणी न्यायालयाने त्याला पाच वर्षे सक्तमजुरी आणि अकरा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दरम्यान, हा खटला उच्च न्यायालयाने सहा महिन्यात निकाली काढण्याचे आदेश दिले होते.राजेंद्र महारू पाटील (वय 56) असे शिक्षा झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. पॉक्सोचे विशेष न्यायाधीश कविता शिरभाते यांनी हा निकाल दिला. दंडाची रक्कम पीडितेला देण्यात यावी, ती न दिल्यास पाटील यास अतिरिक्त सहा महिन्यांचा कारावास भोगावा लागेल. याखेरीज, गुन्ह्यात जप्त केलेली रिक्षा मूळ मालकास परत करावी, असेही न्यायालयाने निकालात नमूद केले.हा प्रकार जून 2023 दरम्यान उघडकीस आला आहे. याप्रकरणीय, सात वर्षीय पीडितेच्या आईने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादी या मुख्याध्यापिका असून, त्यांची मुलगी त्यांच्याच शाळेत पहिलीमध्ये शिकते. त्या कोठेही ये-जा करण्यासाठी पाटील याची रिक्षा वापरत असत. दररोजचे ये-जा असल्याने त्यांची ओळख झाली. त्यानंतर मुलीसह स्वत:ला शाळेत ये-जा करण्यासाठी त्यांनी पाटील यांची रिक्षा ठरवली. 16 नोव्हेंबर 2023 रोजी चिमुकलीने रिक्षात बसण्यास नकार दिला. घरी आल्यानंतर तिच्याकडे विचारपूस केल्यानंतर तिने पाटील याने रिक्षामध्ये जबरदस्तीने हात पकडून् त्याच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श् करण्यास सांगितला तसेच चॉकलेटच्या आमिषाने घरी नेऊन तिचा विनयभंग केल्याचे सांगितले.याप्रकरणी, पाटील याला अटक करत त्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. याप्रकरणात, विशेष सरकारी वकील नितीन कोंघे यांनी तीन साक्षीदार तपासले. त्यामध्ये, पीडिता, वैद्यकीय अहवाल व फिर्यादीची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयाने सरकार पक्षासह बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेत आरोपीला शिक्षा सुनावली. हडपसर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अब्दागीरे यांनी याप्रकरणाचा तपास केला. पोलिस हवालदार संभाजी म्हांगरे यांनी कोर्ट पैरवी म्हणून कामकाज पाहिले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPune Crimeपुणे क्राईम बातम्याCourtन्यायालय