शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सुटीत फिरायला जाताय, आनंदवार्ता; उन्हाळी हंगामासाठी दोन रेल्वे गाड्यांच्या कालावधीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 09:54 IST

खडकी - इंदूर, हडपसर -प्रयागराज गाड्यांचा समावेश

पुणे : आगामी उन्हाळी हंगाम सुरू होत असल्याने प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेकडून खडकी इंदूर आणि हडपसर प्रयागराज या दोन गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये इंदूर खडकी इंदूर साप्ताहिक विशेष आणि हडपसर -प्रयागराज साप्ताहिक विशेष गाड्या होळीसाठी सोडण्यात येत आहेत. प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे या गाड्यांचा कालावधी वाढविण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला असून, इंदूर, प्रयागराजसह उत्तर व मध्य प्रदेशात जाणाऱ्यांना तिकीट आरक्षणउपलब्ध झाले आहे.

ट्रेन क्रमांक ०९३२४ इंदूर खडकी विशेष गाडी दि. ४ ते २५ मार्चदरम्यान आठवड्याच्या प्रत्येक बुधवारी सकाळी सव्वाअकरा वाजता इंदूर येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे २ वाजून ५० मिनिटांनी वाजता खडकी येथे पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०९३२३ खडकी - इंदूर  स्पेशल ट्रेन दि. ५ ते २६ मार्च दरम्यान दर गुरुवारी खडकीहून पहाटे ४ वाजून ४० मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी इंदूरला पोहोचेल.

ट्रेन क्रमांक ०४१०७ प्रयागराज-हडपसर विशेष ट्रेन दि. २५ मार्चपर्यंत दर बुधवारी सकाळी १० वाजून २० मिनिटांनी प्रयागराज येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी साडेसात वाजता हडपसरला पोहचेल. ट्रेन क्रमांक ०४१०८ हडपसर - प्रयागराज स्पेशल गाडी दि. २६ मार्चपर्यंत दर गुरुवारी रात्री १० वाजून ४० मिनिटांनी हडपसरहून सुटेल आणि शनिवारी (तिसऱ्या दिवशी) सकाळी साडेसहा वाजता प्रयागराज येथे पोहोचेल. या दोन रेल्वे गाड्यांच्या कालावधीत वाढ केल्यामुळे अनेक प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे. सुटीसाठी प्रवाशांची संख्याही वाढलेली असते.

English
हिंदी सारांश
Web Title : Good News: Railway Extends Special Trains for Summer Travel!

Web Summary : Central Railway extends Indore-Khadki and Hadapsar-Prayagraj special train services due to increased passenger traffic during the summer season. This extension provides relief, offering ticket availability for travel to Madhya Pradesh and Uttar Pradesh.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र