शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

पाणी मीटरला माजी नगरसेवकांचा विरोध;थेट गुन्हे दाखल करण्याचा महापालिकेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 13:46 IST

मीटरनुसार पाणीपट्टी आकारताना महापालिका १ हजार लिटर पाण्यासाठी साडेसात रुपये शुल्क आकारले जाणार आहे. म्हणजेच एखाद्या घरात सहा ते सात व्यक्ती असल्यास त्यांनी निकषानुसार पाणी घेतल्यास रोज अवघे साडेसात रुपयांचे बिल द्यावे लागणार

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांचा रोष नको म्हणून महापालिकेकडून समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत बसविण्यात येणाऱ्या पाणी मीटरला माजी नगरसेवक व राजकीय मंडळींकडून विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने मीटरला विरोध करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचा निर्वाणीचा इशारा दिला आहे.महापालिकेच्या पाणी वितरण व्यवस्थेमध्ये असणारी ४० टक्के गळती थांबविण्यासाठी आणि नागरिकांना एकसमान पाणीपुरवठा करण्यासाठी समान पाणीपुरवठा योजना हाती घेतली आहे. ही योजना पुढील ३० वर्षांचा विचार करून आणि शहराची संभाव्य ४९ लाख २१ हजार ६६३ लोकसंख्या विचारात घेऊन आखली आहे. योजनेंतर्गत शहरात २ लाख ६३ हजार पाणी मीटर बसविले जाणार आहेत. मीटर बसविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना मीटरप्रमाणे पाणी पट्टी आकारली जाणार आहे. मात्र, सुरुवातीपासूनच नागरिक व राजकीय मंडळींकडून मीटर बसविण्यास विरोध होत आहे. योजनेची इतर कामे अंतिम टप्प्यात आली असताना मीटर बसविण्याचे काम मात्र कासव गतीने सुरू आहे. आतापर्यंत १ लाख ८५ हजार मीटर बसविण्यात आली आहेत. अजूनही ७८ हजार मीटर बसविणे बाकी आहे.दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे महापालिकेची प्रभाग रचना तयार करण्याचे काम जवळपास संपत आले आहे. येत्या सोमवारी महापालिकेने तयार केलेली प्रभाग रचना नगरविकास विभागाला सादर केली जाणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर मीटर प्रमाणे पाणीपट्टी आकारली गेली, मतदारांचा रोष वाढू शकतो.

त्यामुळे माजी नगरसेवक व राजकीय नेत्यांकडून आपल्या परिसरात मीटर बसविण्यास विरोध केला जात आहे. दुसरीकडे जलसंपदा विभागाकडून महापालिकेच्या पाणी वापरावर वारंवार बोट ठेवले जात आहे. विविध बैठकांमध्ये महापालिका जास्त पाणी वापरते, हेच रेटले जाते. या पार्श्वभूमीवर महापालिकेने पाण्याचे मीटर बसविण्यास विरोध केल्यास नळ जोडणीच बंद करण्याचा व संबंधितावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.या भागात विरोध  कोथरूड, कसबा पेठ, धनकवडी, कात्रज, मध्यवर्ती पेठांचा भाग, ससाणेनगर, येरवडा, कोंढवा, मोहम्मदवाडी, मार्केट यार्डमीटरनुसार पाणीपट्टी आकारल्यानंतर काय होणार..?मीटरनुसार पाणीपट्टी आकारताना महापालिका १ हजार लिटर पाण्यासाठी साडेसात रुपये शुल्क आकारले जाणार आहे. म्हणजेच एखाद्या घरात सहा ते सात व्यक्ती असल्यास त्यांनी निकषानुसार पाणी घेतल्यास रोज अवघे साडेसात रुपयांचे बिल द्यावे लागणार आहे. तसेच निकषापेक्षा जास्त पाणी घेतल्यास जादा पैसे मोजावे लागणार आहेत. परिणामी, पाण्याचे बिल अधिक आल्यास नागरिक पाण्याचा वापर कमी करतील, तसेच नागरिकांच्या मिळकत कर बिलातून पाणीपट्टी रद्द होणार आहे.

सर्व मीटर बसविल्यानंतरच पाण्याची गळती शाेधून ती रोखणे शक्य होणार आहे. त्यामुळे मीटर बसविण्यास सहकार्य करावे, अन्यथा संबंधितांची नळजोडणी बंद करून गुन्हा दाखल केला जाईल.  - एम. जे. प्रदीप चंद्रन, अतिरिक्त आयुक्त, महापालिका 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड