शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

Video : ओतूरमध्ये पिंजऱ्यात अडकली बिबट मादी; ग्रामस्थांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 16:04 IST

गेल्या काही दिवसांपासून हांडेबन आणि गाढवपट परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन होत होते.

ओतूर ( ता. जुन्नर)  : ओतूर परिसरात वाढत्या बिबट्याच्या हालचालींमुळे ग्रामस्थांमध्ये निर्माण झालेल्या भीतीच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अखेर बिबट मादी अडकली. गुरुवार (दि. १९) पहाटे साडेपाचच्या सुमारास गाढवपट परिसरात ही कारवाई यशस्वी ठरली.गेल्या काही दिवसांपासून हांडेबन आणि गाढवपट परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन होत होते. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. ग्रामस्थांच्या मागणीनुसार वनविभागाने सापळा लावला होता आणि अंदाजे १ ते दीड वर्षे वयाची बिबट मादी त्यात अडकली. घटनेची माहिती मिळताच ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी चैतन्य कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल एस. एम. बुट्टे, वनरक्षक के. एस. खरोडे व किसन केदार यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवून बिबट मादीला सुरक्षितपणे माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथे हलवले.स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार पहाटे साडेचार ते पाचच्या दरम्यान पिंजऱ्यात हालचाल जाणवत होती. टॉर्चच्या प्रकाशात पाहिले असता बिबट अडकल्याचे दिसले. त्या वेळी पिंजऱ्याच्या आसपास दुसरी मोठी बिबट मादी आणि पिल्लूही फिरताना दिसल्याची माहिती नागरिकांनी दिली.वनविभागाने वेळेवर कारवाई केल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच वन्यप्राण्यांच्या हालचाली दिसल्यास घाबरू नये, तात्काळ वनविभागाला कळवावे आणि रात्री एकटे फिरणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Leopard Trapped in Otur, Relief for Villagers

Web Summary : A leopard was captured in Otur after villagers reported frequent sightings. Forest officials safely relocated the one-year-old female to Manikdoh Leopard Rescue Center. Locals reported seeing another adult leopard and cub nearby. The forest department urges caution and reporting of wildlife sightings.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडLeopard Attackबिबट्याचा हल्लाleopardबिबट्याPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र