शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आळंदी व देहू पालखी मार्गावरील कामे १५ मे अखेर पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 15:20 IST

आळंदी आणि देहू संस्थानच्या पदाधिकाऱ्यांसोबत आयोजित करण्यात आलेल्या विशेष आढावा बैठकीत ते बोलत होते.

आळंदी : आगामी आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहू आणि आळंदी पालखी मार्गावरील सर्व विकासकामे १५ मेपूर्वी पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. आळंदी आणि देहू संस्थानच्या पदाधिकाऱ्यांसोबत आयोजित करण्यात आलेल्या विशेष आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पालखी सोहळ्यासाठी प्रशासकीय स्तरावर सकारात्मक भूमिका घेत सर्व प्रलंबित मागण्यांवर ठोस कार्यवाही करण्याची ग्वाही दिली. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, प्रांताधिकारी अनिल दौंडे, देहू संस्थानचे विश्वस्त गणेश मोरे आणि आळंदी संस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त योगी निरंजननाथ, चैतन्य महाराज कबीरबुवा, पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

देहू ते देहू रोड या पाच किलोमीटर अंतराच्या रस्ते रुंदीकरणाबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने आपापल्या हद्दीतील कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत. या कामासाठी आवश्यक असलेले देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नाहरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय स्वतः पाठपुरावा करणार आहे. तसेच देहू येथील मंदिरापर्यंतचा ५०० मीटरचा रस्ता नगरोत्थान योजनेतून पूर्ण केला जाणार आहे. संत तुकाराम महाराज पालखीचा पहिला मुक्काम आकुर्डी येथे असतो, मात्र तेथे जागेची अडचण असल्याने तात्पुरती जागा उपलब्ध करून देण्यासाठी संयुक्त पाहणी केली जाईल. काळभोर नगर ते आकुर्डी दरम्यानचे मेट्रोचे काम पालखी आगमनापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. लोणी काळभोर येथील पालखी मुक्कामासाठी जागा वाढवून देण्यात येणार असून, गवळ्याची उंडवडी, सणसर आणि निमगाव केतकी येथील मुक्कामाच्या जागेचे प्रश्नही प्रशासनामार्फत सोडविले जातील.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर संचेती रुग्णालय ते एफ.सी. रोडपर्यंत रात्रीच्या वेळी अखंडित प्रकाश व्यवस्था राहील, याची खात्री करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. बोरावके मळा ते सासवड दरम्यानच्या नवीन बायपास मार्गावरील अडथळे दूर करून दिवेघाटात आवश्यक त्या ठिकाणी बॅरिकेड्स उभारले जातील. पालखी सोहळ्यादरम्यान मार्गावर कोणतीही वाहने बंद पडल्यास वाहतूककोंडी होऊ नये, म्हणून सोबत क्रेनची व्यवस्था ठेवण्याची जबाबदारी पोलिस आणि प्रशासनाकडे सोपवण्यात आली आहे. या बैठकीत नीरा येथील जुना पूल तातडीने पाडण्याचे आदेश देण्यात आले असून, आळंदी नगरपालिका क्षेत्रातील रस्ते रुंदीकरण आणि प्रलंबित कामांना गती देण्याच्या सूचना संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. वारीच्या परतीच्या प्रवासातही भाविकांसाठी पुरेशा रुग्णवाहिका उपलब्ध ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Complete Alandi-Dehu Palkhi route work by May 15: Collector's order

Web Summary : Collector orders completion of Alandi-Dehu Palkhi route works by May 15. Key directives include road widening, resolving land issues, uninterrupted lighting, and crane availability to prevent traffic congestion. Focus is on facilitating smooth pilgrimage.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र