शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘देवदूत’ची फाइल आणि कागदपत्रेही सापडेना; ११ कोटी ४२ लाख खर्चून घेतलेल्या गाड्यांचा वापर नगण्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 14:49 IST

तीनही विभाग संबंधित फाइल आमच्याकडे नाही, असे म्हणत एकमेकांकडे बोट दाखवत आहेत.

- हिरा सरवदे पुणे : आपत्तीच्या वेळी रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यासाठी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने २०१६ मध्ये ११ कोटी ४२ लाख रुपये खर्च करून घेतलेल्या आणि त्यावेळी वादग्रस्त ठरलेल्या देवदूत गाड्यांचा वापर नगण्य असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन विभाग, नगरसचिव कार्यालय आणि अग्निशामक विभाग या तीनही विभागाकडे देवदूत संदर्भातील कागदपत्रे किंवा फाइल काहीच पाहायला मिळत नाहीत. तीनही विभाग संबंधित फाइल आमच्याकडे नाही, असे म्हणत एकमेकांकडे बोट दाखवत आहेत.आग, पूर, झाडपडी, भिंतपडी, इमारत कोसळणे, इमारतीमध्ये किंवा लिफ्टमध्ये कोणी अडकले असेल तर त्याला बाहेर काढणे, अशा विविध आपत्ती किंवा संकटाच्या काळात नागरिकांसह प्राणी, पक्ष्यांच्या मदतीसाठी महापालिकेचा अग्निशामक विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग कार्यरत आहे. अग्निशामक विभागाचे मुख्यालय भवानी पेठ येथे असून, शहरात विविध २० ठिकाणी अग्निशामक केंद्र आहेत. तर महापालिका भवनच्या चौथ्या मजल्यावर आपत्ती व्यवस्थापन विभागाचा नियंत्रण कक्ष आहे. आपत्तीच्या वेळी मदतीसाठी किंवा नागरी समस्यांसाठी कक्षात फोन आल्यानंतर ती घटना अग्निशामक विभागास किंवा संबंधित विभागास कळविली जाते. आपत्ती व्यवस्थापनाकडे कॉल सेंटर सोडून आपत्तीच्या वेळी मदत करण्याची स्वत:ची अशी कोणतीही यंत्रणा नाही.दरम्यान, आपत्तीच्या वेळी रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने २०१६-१७ मध्ये ११ कोटी ४२ लाख रुपये खर्च करून ६ देवदूत वाहने खरेदी केली होती. एका देवदूत गाडीची किंमत १ कोटी ९० लाख रुपये असल्याचे ही खरेदी वादात सापडली होती. 'देवदूत'च्या वाहनांना 'मर्सिडीज बेंझ'चे इंजिन असल्याने या वाहनांची मूळ किंमत म्हणून एक कोटी ८४ लाख रुपये दिल्याचे स्पष्टीकरण आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख गणेश सोनुने यांनी त्यावेळी तत्कालीन महापौर व आयुक्त यांच्यासमोर दिले होते. त्यावर तत्कालीन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी 'देवदूत' योजनेची चौकशी करून तिची उपयुक्तता, त्यावरील खर्च पाहून अंमलबजावणीचा विचार करू. तसेच योजना आणि खर्चात त्रुटी आढळल्यास दोषींवर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. मात्र पुढे काहीच झाले नाही.त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाने दोन वर्षे देवदूतची सहा वाहने स्वत:कडे ठेवून नंतर ती अग्निशामक विभागाकडे हस्तांतरित केली. शहरातील विविध प्रकारच्या आपत्तीवेळी देवदूत वाहनांचा किती प्रमाणात वापर झाला, याचा कसलाही डेटा आपत्ती व्यवस्थापनाकडे आणि अग्निशामक दलाकडेही नाही. याशिया देवदूत संदर्भातील फाइल किंवा इतर कागदपत्रे आपत्ती व्यवस्थापन विभाग, नगरसचिव कार्यालय आणि अग्निशामक विभाग या तीनही विभागाकडे सापडत नाही. त्यामुळे देवदूत गाड्यासंदर्भातील माहिती प्रशासन का लपवत आहे, यात काय गौडबंगाल आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अधिकारी काय म्हणाले...- देवदूतसंदर्भात नगरविकास विभागाकडे चौकशी केल्यानंतर संबंधित डॉकेट आपत्ती व्यवस्थापन विभागाचे होते, त्यांच्याकडे माहिती मिळेल, असे सांगण्यात आले.- आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख गणेश सोनुने यांच्याकडे विचारणा केल्यानंतर त्यांनी सुरुवातीला माहिती देतो असे सांगितले. मात्र, प्रश्न अडचणीचे असल्याचे लक्षात येताच अग्निशामक विभागाकडे बोट दाखले. 'देवदूत'च्या वाहनांना 'मर्सिडीज बेंझ'चे इंजिन आहे की नाही हे तपासले का, या प्रश्नावर मात्र, सोनुने यांनी उत्तर देणे टाळले.- अग्निशामक विभागाचे प्रमुख देवेंद्र पोटफाडे यांनी सुरुवातीला फोन घेतला. देवदूतचा आताही वापर होतो, एवढेत सांगितले, नंतर फोनच घेतले नाहीत. देवदूतचा वापरच नाही...अग्निशामक दलात सामील झालेल्या देवदूत गाड्यांचा वापर ठेकेदाराची लोक असेपर्यंतच कमी अधिक प्रमाणात होत होता. त्यानंतर या गाड्यांचा वापर बंद आहे. गाड्या अग्निशामक दलाच्या मुख्यालयात तीन-चार वर्षांपासून उभ्या आहेत. त्याचा वापर होत नसल्याने त्याही काही साधने खराब होण्याची शक्यता आहे, अशी माहिती अग्निशामक दलातीलच सूत्रांनी दिली होती. मात्र, याबाबत अग्निशामक दलाचे प्रमुख वापर सुरू असल्याचे सांगतात. दुसरीकडे त्यांचा विभाग देवदूतचा वापर किती व कसा होतो, याची माहिती देत नाही.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र