शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

पैसे घेऊन काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे उपमुख्यमंत्र्यांनी टोचले कान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 13:09 IST

सातबारा नोंदीसाठी पैशाची मागणी केल्याची अजित पवारांकडे कार्यकर्त्याची तक्रार

बारामती :बारामतीत शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना एवढ्या सुविधा देतो. सगळ्यांना जे काही पाहिजे ते देण्याचा प्रयत्न करतो. इथे येताना नव्या पैशाचा खर्च येत नाही. शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग दिला जात आहे. आता आठवा वेतन आयोग आल्यावर ताे द्यावा लागणार आहे. तरीही कामे करताना पैशाची कशासाठी मागणी करता. हे असलं काही अजिबात खपवून घेणार नाही. कोणीही कोणाच्याही वशिल्याने आलेला असला तरी मला काहीही घेणं-देणं नाही. काही जण फार सोकावलेले आहेत. त्यामुळे लक्ष घालून अशा लोकांना सरळ केल्याशिवाय गत्यंतर नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कामे करण्यासाठी पैशांची मागणी करणाऱ्या शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांना सुनावले.

बारामती येथे शुक्रवारी (दि. २८) एका आयोजित कार्यक्रमात पवार यांनी घडलेला किस्सा कथन करताना संबंधितांना निर्वाणीचा इशारा दिला. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, माळेगाव येथे एका ठिकाणी गेलो होताे. यावेळी माझ्या जवळचा कार्यकर्ता भेटला. यावेळी त्या कार्यकर्त्याने सातबारावर जमिनीची नोंद करण्याच्या साध्या कामासाठी तलाठी का कोण त्याने १५ हजारांची मागणी केल्याची तक्रार माझ्याकडे केली आहे. त्या संबंधित तलाठी यांना बोलावले आहे. त्याचा बंदोबस्तच करणार असल्याचे यावेळी पवार यांनी स्पष्ट केले.यावेळी त्यांनी एवढा कडक वागूनदेखील निवडणुकीदरम्यान मलिदा गँगचा झालेल्या उल्लेखाची आठवण काढली. एक तर मलिदा गँगमुळे नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मी बारामतीच्या विविध विकासकामांसाठी कोट्यवधींचा निधी आणतो. हे सर्व आपण सर्वसामान्यांसाठी करतो. मात्र, काही पुढारी मला काम द्या, मला कुठलेतरी टेंडर देण्याची मागणी करतात. त्यामुळे ज्याला पुढारपणा करायचा आहे, त्याने ठेकेदारी करू नये आणि ज्याला ठेकेदारी करायची आहे त्याने पुढारपण करू नये, असे पवार यांनी सुनावले.

नीरा डावा कालव्याचे पाणी पूर्ण क्षमतेने वाहण्यासाठी तीन हत्ती चौकातील पूल उंच करावा लागला. त्यावेळी माझ्यावर मोठी टीका झाली. काहींनी पाहणीसाठी या कामाची माहिती नसणारी माणसे बाहेरून आणली. मी पहाटे पाचला उठून सहाला पाहणी करतो. त्यावेळी अनेकजण साखरझोपेत असतात. आपण काम करताना कुठे चुका झाल्या तर त्या दुरुस्तही करतो. मार्ग काढतो, ड्रोनद्वारे पाहणी करून पुलावरील वाहतुकीचे नियोजन करण्याची दक्षता घेतली, असा टोला अजित पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता लगावला. बारामतीकरांनी चुकीच्या दिशेने वाहने नेऊ नयेत, असा सल्लादेखील यावेळी अजित पवार यांनी दिला.

शिल्लक बेडची माहिती एका क्लिकवर

वैद्यकीय क्षेत्रासाठी नुकताच एक कायदा ‘पास’ केला आहे. मोठ्या रुग्णालयांमध्ये सर्वसामान्यांसाठी राखीव जागा ठेवणे आवश्यक आहे; पण काही जण गडबड करीत होते. पण आता कोणालाही यातून पळवाट काढता येणार नाही. कारण, मंत्रालयस्तरावर एका ‘क्लिक’वर शिल्लक बेडची माहिती ‘सीएम’ आणि ‘डीसीएम’ना आता समजणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सीटबेल्टबाबत दंडात्मक कारवाईचा कायदा कडक केल्याचे पत्र एकाने मला पाठविले. वास्तविक, ‘गडकरीसाहेबां’नी तो कायदा सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आणला आहे. सीटबेल्ट, हेल्मेट वापरून कारवाई टाळण्याची भूमिका प्रत्येकाने घेतली पाहिजे, अशी सूचना अजित पवार यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAjit Pawarअजित पवारBaramatiबारामती