पुणे : दिल्लीवरून पुण्याला येणाऱ्या स्पाइस जेट (एसजी ९७) या विमानाला तीन तास उशीर झाला. यामुळे प्रवाशांना विमानतळावर तीन तास ताटकळत थांबावे लागले. राजधानी दिल्लीत काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्याचा परिणाम विमानाच्या वेळेवर होत आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
दरम्यान, पुण्यावरून चेन्नईला जाणाऱ्या एअर इंडिया (आयएक्स २६६०) या विमानाला दीड तास उशीर झाला. गेल्या काही दिवसांपासून पुणे विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या विमानांनादेखील वारंवार उशीर होत आहे. त्यामुळे विमान प्रवाशांना गैरसोयीचा फटका बसत आहे.
दुसरीकडे, पुण्यावरून दिवसेंदिवस प्रवासी संख्या वाढत आहे. परंतु, विमानांना होणारा उशिराचा फटका प्रवाशांना बसत असून, प्रवासाचे नियोजन कोलमडत आहे.