शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात भरदिवसा दरोडा..! गजानन ज्वेलर्स मालक, कर्मचाऱ्यावर कोयता हल्ला करत लूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 14:36 IST

- या हल्ल्यात दुकानमालक आणि एक कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पुणे : शहरातील सुरक्षेच्या दाव्यांना धक्का देणारी घटना मंगळवारी दुपारी घडली. सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुक येथील ‘गजानन ज्वेलर्स’ या दागिन्यांच्या दुकानावर चार अज्ञात दरोडेखोरांनी भरदिवसा कोयत्याने हल्ला करत लाखोंचा ऐवज लुटला. या हल्ल्यात दुकानमालक आणि एक कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सकाळी ११ च्या सुमारास घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरोडेखोरांनी थेट दुकानात शिरून, काहीही न बोलता कोयत्याने सपासप वार करत दुकानातील लोकांना जखमी केले. त्यानंतर दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा लाखोंचा ऐवज उचलून ते पसार झाले.घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परंतु, या घटनेनंतर नागरिकांमधून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. भरदिवसा, मुख्य रस्त्यावर असलेल्या दुकानात दरोडा पडतो, आणि पोलिसांना याची खबर लागते तेव्हा सगळं उरकून दरोडेखोर पसार होतात, ही बाब गंभीर आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केल्याचा दावा केला असला, तरी दरवाढती गुन्हेगारी आणि दिवसाढवळ्या अशा घटनांनी पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी